Security Guard
Security Guard Sakal
पुणे

Pune News : पुणे महापालिकेतील ३५० सुरक्षारक्षकांना ४५वे वरीस धोक्याचे

सकाळ वृत्तसेवा

वर्षानुवर्षे महापालिकेत कंत्राटी सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्यांना आता ‘तुम्ही वयाची ४५ वर्षे ओलांडली आहेत. कामावर येऊ नका, घरी बसा’, असे सांगण्यात आले.

पुणे - वर्षानुवर्षे महापालिकेत कंत्राटी सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्यांना आता ‘तुम्ही वयाची ४५ वर्षे ओलांडली आहेत. कामावर येऊ नका, घरी बसा’, असे सांगण्यात आले. या एका आदेशाने २० टक्के म्हणजे सुमारे ३५० सुरक्षारक्षक बेरोजगार झाले. यात संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असणाऱ्या पुरुषांसह विधवा महिलांचा समावेश आहे.

कामावर घेण्याचा आदेश

महापालिकेच्या या निर्णयानंतर पुणे जिल्हा सुरक्षा मंडळाने महापालिकेला खरमरीत पत्र पाठवून सुरक्षा रक्षकांचे निवृत्तीचे वय ठरविण्याचे अधिकार महापालिकेला नाहीत. सुरक्षारक्षकांना कामावरून काढून टाकणे बेकायदा आहे, त्यामुळे त्यांना कामावर घ्यावे, असा आदेश मंडळाचे सचिव श्री. ह. चोभे यांनी दिला आहे.

दोन कंपन्यांचे १,६४० रक्षक

महापालिकेत यापूर्वी ज्या कंपनीकडे सुरक्षारक्षक पुरविण्याचे काम होते, त्यांनी वेळेवर पगार दिले नाहीत. त्यामुळे प्रशासनाने कंपनीला नोटिसा पाठविल्या होत्या. कंपनीची मुदत ३१ आॅगस्ट रोजी संपल्यानंतर आता नवीन ठेकेदार नियुक्त करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, एक हजार ६४० सुरक्षारक्षक दोन कंपन्यांकडून घेतले आहेत. यामध्ये प्रत्येकी एका कंपनीला ८२० सुरक्षारक्षक पुरविण्याचे काम दिले आहे.

कशामुळे वाद निर्माण झाला?

1) नवीन ठेकेदार नियुक्त केल्यानंतर त्यांनी ४५ वर्षांच्या पुढील सुरक्षारक्षकांना नियुक्तीपत्र देण्यास नकार दर्शविला.

2) वाढलेले वय, त्यानुसार शारीरिक हालचालींवर आलेली मर्यादा... अशी कारणे देण्यात आली.

3) विविध कारणांमुळे ३०० ते ३५० सुरक्षारक्षकांना बेरोजगार होण्याची वेळ आली.

4) यापूर्वी अशी भूमिका कोणत्याही ठेकेदाराने घेतलेली नव्हती. त्यामुळे ठेकेदार बदलला तरी काम करणारे कर्मचारी तेच होते. या कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाल्याने राष्ट्रीय मजदूर संघाने पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाकडे याची तक्रार केली. त्यानुसार ४५ वयाच्या अटीवर आक्षेप घेऊन हा निर्णय मागे घ्यावा, असे आदेश दिले आहेत.

सुरक्षारक्षकांची गरज...

  • महापालिकेची मुख्य इमारती

  • क्षेत्रीय कार्यालये

  • विविध वास्तू

  • मैदाने

  • उद्याने

सुरक्षा रक्षक हे सुदृढ हवे आहेत. त्यामुळे ४५ वयाची अट टाकली आहे. जर सुरक्षा मंडळाने पत्र दिले असले तरी हा नियम महापालिकेचा आहे. या वयाच्या अटीत बदल करायचा असले तर तो आयुक्तांच्या अधिकारात केला जाईल.

- माधव जगताप, उपायुक्त, सुरक्षा विभाग

महापालिकेला वय ठरविण्याचा अधिकार नाही, त्यांचे नियम कायद्यापेक्षा मोठे नाहीत. त्यामुळे ४५ वयाच्या पेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेतले पाहिजे. काही राजकीय व्यक्तीच्या लोकांना कामावर घेण्यासाठी इतर कर्मचाऱ्यांना कमी केले जात आहे. जिल्हा सुरक्षा मंडळाच्या आदेशाचे पालन न केल्यास महापालिकेसह ठेकेदारावरही कारवाई होऊ शकेल.

- सुनील शिंदे, अध्यक्ष, राष्ट्रीय मजदूर संघ

विधानसभेत मुद्दा उपस्थित

नागपूर येथील विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार चेतन तुपे यांनी सुरक्षारक्षकांचे वय जास्त आहे म्हणून कामावरून कमी केले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तुटपुंज्या पगारावर कर्मचारी काम करत आहेत, यातील अनेक महिला विधवा आहेत. निवृत्तीचे वय ६० असताना ४५ वयातच कामावरून कमी करणे चुकीचे आहे. महिलांचा सन्मान व हक्काबाबत सत्ताधारी केवळ बोलतात; पण कार्यवाही होत नाही, अशी टीका तुपे यांनी विधानसभेत केली.

  • ६५० - महापालिकेत सुरक्षारक्षकांच्या जागा

  • ३५० - महापालिकेत सुरक्षारक्षक कार्यरत

निर्णय योग्य की अयोग्य?

कंत्राटी सुरक्षारक्षकांनी वयाची ४५ वर्षे ओलांडली म्हणून त्यांना कामावर येऊ नका, असे सांगणे योग्य आहे का? याबाबत आपल्या सूचना नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahavikas Aghadi : विधानसभेसाठीही एकजूट; ‘मविआ’चा निर्धार

India Aghadi : राहुल गांधींवर ‘इंडिया’चा दबाव

Heavy Rain : पावसामुळे सिक्कीममध्ये हाहाकार! रस्ते खचले, नऊ जणांचा मृत्यू,‘तिस्ता’ची पातळी वाढली

Sasoon Hospital : मेफेड्रोन प्रकरणाचा तपास ‘एनसीबी’कडे; मुख्य सूत्रधार संदीप धुनिया मात्र अद्याप फरार

Mahayuti Leaders : महायुतीच्या नेत्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध; आमदारांची नाराजी दूर करण्याचा शिवसेना, राष्ट्रवादीचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT