vaccination 
पुणे

पुणे : महापालिकेच्या 65 केंद्रांवर लसीकरण

सकाळ वृत्तसेवा

पुणे- शासनाकडून महापालिकेला उपलब्ध झालेल्या कोव्हिशील्ड लसीच्या साठ्यातून उद्या (सोमवारी) महापालिकेच्या ६५ केंद्रांवर ४५ वयाच्या पुढील नागरिकांसाठी लसीकरण केले जाणार आहे. शनिवारी (ता. २२) महापालिकेला शासनाकडून १३ हजार डोस उपलब्ध झाले आहेत. त्यानुसार आज (रविवारी) महापालिकेने ७० केंद्रांवर लसीकरण सुरू केले होते. गेले दोन दिवस कोव्हीशील्डचे लसीकरण बंद असल्याने केंद्रांवर गर्दी केली होती. प्रत्येकी केंद्रावर १०० डोस उपलब्ध होते, पण नागरिकांनी भरपूर गर्दी केल्याने रांगा लागलेल्या होत्या.

महापालिकेकडे सुमारे साडे सहा हजार डोस शिल्लक आहेत, त्यानुसार सोमवारचे नियोजन करण्यात आले असून, ६५ केंद्रांवर प्रत्येकी १०० डोस पुरविण्यात आलेले आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. (Pune municipal corporation covishild

vaccination)

असे होणार लसीकरण

- कोव्हीशील्डचा पहिला डोस घेऊन ८४ दिवसांपूर्वी (२८ फेब्रुवारी) घेणाऱ्या नागरिकांना दुसरा डोस मिळेल.

- दुसऱ्या डोससाठी २० टक्के लस उपलब्ध

- पहिल्या डोससाठी आॅनलाइन बुकिंग करणाऱ्यांसाठी ६० टक्के डोस उपलब्ध

- आॅनलाइन बुकिंग सोमवारी सकाळी ८ वाजता सुरू होईल.

- पहिल्या डोससाठी थेट लसीकरण केंद्रांवर जाणारे आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन कर्मचारी व ४५ च्या पुढील नागरिकांसाठी २० टक्के डोस राखीव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Crime: आधी डोक्यात टीव्ही फोडला, नंतर हंड्याने बेदम मारहाण, पतीचं पत्नीसोबत धक्कादायक कृत्य; ठाण्यात काय घडलं?

Latest Marathi News Live Update : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्यासह विशेष विमानाने दिल्लीला जात आहेत

Obesity Care: लठ्ठपणाविरोधातील लढ्याला चालना; वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथे अत्याधुनिक ऑबेसिटी क्लिनिकची सुरुवात

"दुनियादारीनंतर मी हवेत होतो" संजय जाधव यांचा धक्कादायक खुलासा "सेटवर मी टाईमपास केला"

Bakri Eid Goat Market: तळेगाव ढमढेरे बाजारात बोकडाला ८० हजार रुपये बाजार भाव, विक्रमी आवक

SCROLL FOR NEXT