हंडामोर्चा आंदोलन  sakal
पुणे

Pune : पिण्याचे पाणी मिळावे याकरिता लोहगावातील महिलांनी महापालिकेविरोधात हंडामोर्चा आंदोलन

आम आदमी पक्षाच्या महिला संघटक सीमा गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले

सकाळ वृत्तसेवा

लोहगाव : पिण्याचे पाणी मिळावे याकरिता लोहगावातील महिलांनी महापालिकेविरोधात हंडामोर्चा आंदोलन केले. आम आदमी पक्षाच्या महिला संघटक सीमा गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

लाखो रुपये खर्च करुन नागरीकांनी इथे घरे बांधली, वर्षोंनवर्षे राहून पालिकेला दिडपट कर भरुनही पाणी मिळत नसल्याने रस्त्यावर येत आंदोलनाकर्त्या महिलांनी संताप व्यक्त केला. याबरोबरच पाण्यासाठी एका कुटुंबाला प्रतिमहा तीन ते चार हजार रुपये खर्च येत असल्याने, सर्वसामान्य नागरीकांनी जगावे कसे? असा उद्विग्न सवाल उपस्थित केला.

योजना नगर परिसरात सुमारे दोनशे घरांची लोकवस्ती आहे. मात्र या घरांसाठी पालिकेच्या वतिने पाण्याची कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसून, सर्व मिळकत धारकांना बोअरवेल आणि खाजगी टँकरवरच अवलंबून रहावे लागते. महापालिकेची जलवाहिनी ही मुख्य रस्त्यावरुन गेलेली आहे, मात्र अंतर्गत रस्त्यावर जलवाहिनी टाकण्यासाठी अनेकवेळा पाठपुरावा करुनही पालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे.

दरम्यान पालिकेच्या वतिने या आंदोलनाची तातडीने दखल घेतली. कनिष्ठ अभियंता सुधीर आल्लुरकर यांनी आंदोलन स्थळी भेट देत, 'हरणतळे वस्ती येथील टाकीचे काम पुर्ण होताच, पाणीपुरवठा सुरळीत करु. तसेच तातडीने महापालिकेच्या वतिने टँकरची व्यवस्था करु.' असे तोंडी आश्वासन दिले. मात्र तोंडी आश्वासन नको, लेखी आश्वासन द्या. असे म्हणत आंदोलनकर्त्यांनी लोहगाव-वाघोली मुख्य रस्ता रोखून धरला.

आंदोलनाची तीव्रता पाहत महापालिकेच्या वतिने तात्काळ लेखी आश्वासन देण्यात आले. तद्नंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यावेळी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत, दत्तात्रय काळजे, सुदर्शन भांडवलकर तसेच परिसरातील नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT