E-Rickshaw sakal
पुणे

E-Rickshaw : इ-रिक्षासाठी महापालिकेने चार्जिंगची सुविधा द्यावी - चंद्रकांत पाटील

पुणे महापालिकेतर्फे राष्ट्रीय शुद्ध हवा उपक्रमाअंतर्गत इ-रिक्षासाठी अनुदान वाटप आणि मिस्ट बेस्ड फाउंटन सिस्टिमचे उद्‍घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरात मेट्रोचे विस्तारीकरण होत असल्याने मेट्रो प्रवाशांची संख्या वाढत जाणार आहे. मेट्रो स्टेशनपर्यंत नागरिकांना येता यावे यासाठी इ-रिक्षाचा वापर चांगल्या पद्धतीने करून घेता येईल. रिक्षा स्टॅंडजवळ चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासंदर्भात महापालिकेने नियोजन करावे, अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

पुणे महापालिकेतर्फे राष्ट्रीय शुद्ध हवा उपक्रमाअंतर्गत इ-रिक्षासाठी अनुदान वाटप आणि मिस्ट बेस्ड फाउंटन सिस्टिमचे उद्‍घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज झाले. अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, विकास ढाकणे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नितीन शिंदे, 'एआरएआय'चे जितेंद्र पुरोहित, पर्यावरण विभागाचे उपायुक्त माधव जगताप, रिक्षा पंचायतीचे प्रतिनिधी नितीन पवार आदी यावेळी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, इ-रिक्षा घेण्यासाठी केंद्र शासन आणि महापालिकेतर्फे एकत्रित १ लाख अनुदान मिळत आहे. इ-रिक्षामुळे इंधनाच्या खर्चात बचत होऊन, त्यांच्या कुटुंबासाठी जास्त उत्पन्न मिळू शकेल. प्रदूषण कमी करण्यासाठी आणि उत्पन्न वाढविण्यासाठी रिक्षा चालकांनी इ रिक्षा वापरण्याकडे वळावे. रिक्षा थांब्याजवळ चार्जिंग स्टेशन उभारण्याबाबत महापालिकेने नियोजन करावे.

मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यानंतर शहरात प्रवाशांची संख्या ४ लाखावर पोहचेल. प्रवाशांना घरापासून मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी इ-रिक्षा, सीएनजी रिक्षाचा वापर होणे गरजेचे आहे. शहरातील चौकात बसविलेल्या मिस्ट बेस्ड फाउंटनमुळे हवेतील धूलिकण कमी होऊन प्रदूषण कमी होईल, असे पाटील यांनी सांगितले.

ढाकणे म्हणाले, शहराची लोकसंख्या ७० लाखापर्यंत पोहोचली असून ५५ लाख वाहनांची नोंदणी झाली आहे. बाहेरील वाहनेही मोठ्या प्रमाणात येत असल्याने प्रदूषण वाढते आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिका अनेक स्तरावर प्रयत्न करीत आहे. इ-रिक्षांना अनुदान, इ-बसचा वापर, मिस्ट बेस्ड फाउंटन अशा विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT