Pune Municipal Corporation  sakal
पुणे

पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना उचल मिळाली, पण बोनस नाही

पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी प्रशासनाने आच अचानक कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेच १० हजार रुपयांची उचल जमा करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी प्रशासनाने आच अचानक कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेच १० हजार रुपयांची उचल जमा करण्यात आली.

पुणे - महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी प्रशासनाने आच अचानक कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेच १० हजार रुपयांची उचल जमा करण्यात आली आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांना दिवाळीचे सानुग्रह अनुदनाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना महापालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांना दरवर्षी १० हजार रुपये आगाऊ उचल दिली जाते. त्यामुळे दिवाळीसाठीची खरेदी करता येते. तसेच दरवर्षी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिले जाते. हे अनुदान मिळावे यासाठी नगरसेवकही अधिकाऱ्यांना भेटून मागणी करतात, स्थायी समितीमध्येही याबाबत चर्चा करून प्रशासनाला आदेश दिले जातात. गेल्या अनेक वर्षापासून किमान १५ दिवस आधी दिवाळी सानुग्रह अनुदान बँक खात्यात जमा केले जाते. पण यंदा महापालिकेवर प्रशासक असल्याने याची चर्चा झाली नाही.

प्रशासनाकडूनही सानुग्रह अनुदान देण्यासाठीचे परिपत्रक अद्याप काढलेले नाही. पण आज संध्याकाळी १० हजार रुपयांची उचल देण्यात आली. दरम्यान, सानुग्रह अनुदानासाठीचा प्रस्ताव लेखा विभागाने तयार करून आयुक्त कार्यालयात पाठवला आहे, पण आयुक्तांची गुरुवार सायंकाळपर्यंत स्वाक्षरी झालेली नाही. याचा निर्णय उद्या न झाल्यास त्यानंतर सोमवार पर्यंत वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे आज गुरुवारी कर्मचारी संघटनांनी देखील आयुक्तांची भेट घेऊन सानुग्रह अनुदानाची मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Soldiers: ४०,००० अमेरिकन सैनिक समुद्रात गायब! शास्त्रज्ञ घेत आहेत शोध, नेमकं काय घडलं?

Pratap Sarnaik : मिरा-भाईंदरचा भूखंड नियमानुसारच घेतला; वडेट्टीवारांच्या आरोपांवर परिवहनमंत्र्यांचा खुलासा

Maharashtra Weather : राज्यात थंडीची जोरदार एंट्री, जळगाव महाबळेश्वरपेक्षाही जास्त गारठले; इतर जिल्ह्यांत कसं आहे हवामान? जाणून घ्या

साताऱ्यात दोन्ही राजे एकत्र येणार ?; उदयनराजे म्हणाले- मनोमिलन राहणार तर शिवेंद्रसिंहराजेंनी दिले 'हे' संकेत..

Sugarcane farmers: 'ऊसदरासाठी शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा'; कऱ्हाड तालुक्यात रास्ता रोको; चार हजार दराची मागणी

SCROLL FOR NEXT