Municipal Commissioner Vikram Kumar
Municipal Commissioner Vikram Kumar Sakal
पुणे

Pune Municipal Engineers : पुणे महापालिकेतील तीन अभियंत्यांवर बोगस अनुभवाचा ठपका

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - महापालिकेतील कनिष्ठ अभियंता भरतीमध्ये अनुभवाचे बनावट कागदपत्र सादर करून नोकरी मिळविल्याने तीन कनिष्ठ अभियंत्यांवर ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. त्यांची नोकरीतून हकालपट्टी करण्यासाठी महापालिकेने प्रक्रिय सुरू केली आहे. त्यास महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मान्यता दिली आहे. दरम्यान, बनावट प्रमाणपत्र सादर करून महापालिकेत नोकरी मिळविण्याचा प्रकार सुरू असल्याचे ‘सकाळ’ने दिले होते.

पुणे महापालिकेने गेल्या वर्षी ४४८ जागांची भरती केली. त्यामध्ये १३५ जागा या कनिष्ठ अभियंत्यांच्या होत्या, त्यासाठी १२ हजार पेक्षा जास्त अर्ज आले होते. आॅनलाइन परिक्षेतून गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांना कागदपत्रांची पडताळणीसाठी बोलविण्यात आले होते. त्यामध्ये तीन वर्षाचा अनुभवाचा पुरावा म्हणून सादर करण्यासाठी फॉर्म १६, बँक स्टेटमेंट, पे स्लीप, अनुभव प्रमाणपत्र, पीएफ क्रमांक यासह ११ प्रकारची कागदपत्र आवश्‍यक होते.

त्यामध्ये पे स्लीप, अनुभव प्रमाणपत्र यासारखी कागदपत्र बनावट तयार करण्यात आल्याचा आरोप यापूर्वी देखील करण्यात आला आहे. तसेच काही जणांनी अभियांत्रिकी डिप्लोमाच्या आधारावर नोकरी मिळवताना अभियांत्रिकीची पदवी लपविली. एका शहरात अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेताना दुसऱ्या शहरात पूर्ण वेळ नोकरी केल्याच अनुभवाचा दाखला जोडला आहे. याबाबत सेवक वर्ग विभागाकडे पुराव्यासह तक्रारी दाखल झाल्या आहेत. तसेच उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती.

याप्रकरणी महापालिका आयुक्तांनी सेवक वर्ग विभागाचे उपायुक्त सचिन इथापे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे आणि मुख्य लेखा परीक्षक अमरिश गालिंदे या तीन अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली होती. त्यामुळे सुमारे ५० जणांची कागदपत्र पडताळणी करण्यात आली. ही प्रक्रिया सुरू असतानाच यातील ५ ते ६ जणांनी वैयक्तीक कारणास्तव नोकरी सोडून दिली. उर्वरीत उमेदवारांच्या कागदत्रांची पडताळणी सुरू होती. त्याचा अहवाल मे महिन्यात सादर केला जाईल असे यापूर्वीच प्रशासनाने स्पष्ट केले होते. चौकशी समितीचा अहवाल आयुक्तांकडे सादर झाल्यानंतर त्यास त्यांनी मान्यता दिली आहे.

‘कनिष्ठ अभियंता भरतीमधील निवड झालेल्या काही उमेदवारांबाबत तक्रारी आल्या होत्या. त्याबाबत चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे, त्यामध्ये अनुभवाचे बनावट दाखले जोडल्याचे स्पष्ट झाले आहे. या उमेदवारांना नोकरीवरून काढून टाकण्यापूर्वी नोटीस बजावली जाणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.’

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT