ganpati stall ganpati
पुणे

Pune News : मूर्ती विक्रेत्यांसाठी जागा निश्‍चीत करण्याचा पुणे महापालिकेला विसर

गणेशोत्सवासाठी काही दिवस शिल्लक असताना महापालिकेतर्फे अद्याप मूर्ती विक्रेत्यांसाठी अधिकृत ठिकाणांची निश्‍चिती केलेली नाही.

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - गणेशोत्सवासाठी काही दिवस शिल्लक असताना महापालिकेतर्फे अद्याप मूर्ती विक्रेत्यांसाठी अधिकृत ठिकाणांची निश्‍चिती केलेली नाही. त्यामुळे शहरात खासगी जागांसह पादचारी मार्ग, रस्त्यावर थेट मांडव टाकून थेट मूर्ती विक्री सुरू करण्यात आली आहे. यामध्ये महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहेच, शिवाय वाहतूक कोंडीत भरही पडत आहे.

यंदाच्या वर्षी १९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या दरम्यान गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने महापालिका आयुक्तांनी नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये मूर्ती विक्रेत्यांसाठीही सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवाच्या पूर्वी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन आणि मालमत्ता व्यवस्थापन विभागातर्फे समन्वयातून मुर्ती विक्रीसाठी महापालिकेच्या शाळा, मैदाने, मोकळ्या जागा या ठिकाणी भाड्याने जागा दिल्या जातात.

त्यामुळे विक्रेत्यांना मोक्याच्या ठिकाणी मूर्ती विक्रीसाठी जागा मिळते. पण यंदाच्या वर्षी अतिक्रमण निर्मूलन आणि मालमत्ता व्यवस्थापनाकडून जागा निश्‍चित झालेल्या नाहीत. विक्रेत्यांना महापालिकेच्या जागा मिळत नसल्याने त्यांनी पादचारी मार्ग, रस्त्यावर मोठे मांडव टाकून मूर्ती विक्री सुरू केली आहे.

दरम्यान आयुक्तांनी केलेल्या जाहीर आवाहनामध्ये मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून हंगामी सोडत काढून व अटी शर्ती टाकून जागा भाड्याने दिल्या जातील असे नमूद केले आहे. पण प्रत्यक्षात मालमत्ता व्यवस्थापनाने अद्याप याची प्रक्रिया देखील सुरू केली नसून, अतिक्रमण विभागाने ठिकाणांची यादी दिल्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाईल असे उपायुक्त महेश पाटील यांनी सांगितले.

तर अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी जागा वाटपाची प्रक्रिया मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून केली जाते. यासंदर्भात या विभागाशी चर्चा केली जाईल असे सांगितले. मात्र, याबाबात अद्याप कोणतीही प्रक्रिया न झाल्याने महापालिकेने मूर्ती विक्रीसाठी जागा निश्‍चित केल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, दरवर्षी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर शाळांची मैदाने, पटांगण, मोकळ्या जागा येथे भाड्याने स्टॉल दिले जातात. नागरिकांना पार्किंगची व्यवस्था असल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी होत नाही, तसेच व्यावसायिकांचाही फायदा होतो.

पण गणेशोत्सव १९ तारखेपासून सुरू होत असताना महापालिकेने स्टॉलसाठीही सोडत प्रक्रिया अद्याप सुरू केलेली नसल्याने रस्ते, पादचारी मार्गावरील स्टॉलची संख्या वाढत आहे. त्यामुळे अतिक्रमण वाढून वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT