wadgaonsheri-garden 
पुणे

पुणे महानगरपालिकेच्या 'या' उद्यानात पक्षी आणि किटकांसाठी मेजवानी (Video)

सकाळवृत्तसेवा

वडगाव शेरी: विमाननगर येथील पुणे महानगरपालिकेच्या उद्यानामध्ये परिसरातील कीटक व पक्षी यांच्यासाठी सध्या खास मेजवानी सुरू आहे. लुंकड फाउंडेशनच्या पुढाकाराने उभारलेल्या नक्षत्र उद्यानात या मेजवाणीचा अनुभव सध्या येतो आहे.

उद्यानातील साधारणतः दहा गुंठे जागेत नक्षत्र उद्यान आहे. त्यातील वाफ्यांमध्ये सुर्यफुलांची लागवड करण्यात आली होती. ती सुर्यफूले सध्या चांगलीच बहरली असून काहींमध्ये बिया भरल्या आहेत. फुलांमधील रस पिण्यासाठी विविध प्रकारच्या मधमाशा, कीटक, भुंगे फुलांभोवती पिंगा घालताना दिसतात तर, विणीचा हंगाम असल्याने विविध पक्षी येथे उपलब्ध असलेले सुर्यफुलांचे बी खाण्यासाठी गर्दी करीत आहेत.

ही सुर्यफूले खास कीटक व पक्षांकरिता लावल्याची माहिती लुंकड रियालिटी व लुंकड फाउंडेशनचे उद्यान व्यवस्थापक दत्ता निकाळजे यांनी दिली. निकाळजे म्हणाले, या ठिकाणी देशी गाईंचे शेणखत वापरून मशागत केल्याने सुर्यफुलांचे पीक छान आले. आम्ही दरवर्षी हा उपक्रम विविध ठिकाणी घेतो. नगर रस्त्यावरील दुभाजकांमध्येही सुर्यफूले लावली आहेत. यामुळे पाखरांना खाद्य उपलब्ध होते. आजूबाजूला पाखरांची घराटीही वाढल्याचे दिसते. हा उपक्रम उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे, राहुल दागलिया, गुरस्वामी तुम्मा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR सुरू होताच निवडणूक आयोगात मोठी उलथापालथ! २० महिन्यांत २० राज्यांचे अधिकारी बदलले; नेमकं कारण काय?

India ODI Squad: जडेजा-जैस्वाल २०२७ वर्ल्ड कपच्या शर्यतीतून बाहेर? न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर होताच मिळाले संकेत

लग्न ठरलं, होणाऱ्या पत्नीसोबत लॉजवर गेला; एकमेकांच्या सहवासात असतानाच २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; अलिबागमध्ये काय घडलं?

ताणतणाव महिलांच्या गायनेकोलॉजिकल हेल्थसाठी किती घातक आहे? डॉक्टरांनी सांगितली महत्वाची माहिती...

Latest Marathi News Live Update : संजय राऊत यांच्या ‘बोध कीर्तन’ पुस्तकाचे ३१ ऑक्टोबरला प्रकाशन; उद्धव आणि राज ठाकरे राहणार उपस्थित

SCROLL FOR NEXT