Pune Municipal Corporation has clarified all schools in city continue  esakal
पुणे

पुणे : शहरातील शाळा आज सुरू राहणार

शहरातील अनेक शाळांनी शाळा थेट सोमवारी उघडतील असे मेसेज पालकांना पाठवून दिले

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील सर्व बोर्डाच्या शाळा आज सुरू राहणार आहेत, असे पुणे महापालिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, शहरातील अनेक शाळांनी शाळा थेट सोमवारी उघडतील असे मेसेज पालकांना पाठवून दिले आहेत. पुणे शहर व परिसरात अतिवृष्टी होणार असल्याने आज (ता. १४) शाळेला सुट्टी देण्यात आली. आज दिवसभरात शहर व परिसरात साधारण पाऊस झाला, त्यामुळे पुणे महापालिकेने शुक्रवारी शाळा सुरू राहतील असे आदेश काढले आहेत. अतिरिक्त आयुक्त विलास कानडे म्हणाले, अतिवृष्टीमुळे शाळांना केवळ आजच्या दिवसपुरतीच सुट्टी होती. शुक्रवारी पुणे शहरातील सर्व बोर्डाच्या शाळा सुरू राहतील, त्यांना सुट्टी देण्यात आलेली नाही.’’

शाळा बंदचे पालकांना मेसेज

पुणे महापालिकेकडून शुक्रवारी शाळा सुरू राहणार की बंद ठेवणार याचा निर्णय लवकर होणे अपेक्षीत होते. मात्र, शाळा सुरू राहतील हे कळविण्यास सायंकाळ झाली. पण शहरातील बहुतांश शाळांनी दुपारीच पालकांना पालकांना शुक्रवारी शाळेला सुट्टी आहे असे मेसेज टाकून दिले. त्यामुळे उद्या पालिकेच्या स्वतःच्या शाळा वगळता इतर शाळा बंदच राहणार अशी असण्याची शक्यता आहे.

उद्या सर्व शाळा भरवा असा आदेश काढला गेला आहे कारण म्हणे आज पाऊस झा.ला नाही! पुणे जिल्हा परिषद, पुणे मनपा शिक्षण मंडळ,जिल्हाधिकारी कार्यालय काहीही मेळ नाही. तिघांचे दोन दिवसात तीन चार आदेश आहेत.

- एका शिक्षकांची प्रतिक्रिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

Pune News: बनावट गॅझेटचा आधार घेत धाकट्या भावाची जमीन हडपली; बारामतीतील धक्कादायक प्रकार, महसूल यंत्रणेच्या हलगर्जीपणातून जमीन घोटाळा

SCROLL FOR NEXT