Pune Municipal Corporation sakal
पुणे

Pune News : पुणे : मलनिःसारण विभाग प्रमुखांची उचलबांगडी

मलनिःसारण विभागातील कारभाराच्या तक्रारी, जलपर्णीच्या कामाची माहिती न देणे, नोटीसला उत्तर देण्यास टाळाटाळ करण्यामुळे मलनिःसारण विभाग प्रमुखांची उचलबांगडी करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

मलनिःसारण विभागातील कारभाराच्या तक्रारी, जलपर्णीच्या कामाची माहिती न देणे, नोटीसला उत्तर देण्यास टाळाटाळ करण्यामुळे मलनिःसारण विभाग प्रमुखांची उचलबांगडी करण्यात आली.

पुणे - मलनिःसारण विभागातील कारभाराच्या तक्रारी, जलपर्णीच्या कामाची माहिती न देणे, नोटीसला उत्तर देण्यास टाळाटाळ करण्यामुळे मलनिःसारण विभागाचे प्रमुख संतोष तांदळे यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांनी पुढच्या दोन दिवसात नोटिसला उत्तर न दिल्यास त्यांची विभागीय चौकशी सुरू केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महापालिका आयुक्तांकडून दर सोमवारी विविध विभागांच्या कामाचा आढावा घेऊन त्यामध्ये किती प्रगती आहे याची माहिती घेतली जाते. तेथे दुरुस्ती आवश्‍यक आहे, त्यासाठी सूचना केल्या जातात. आयुक्तांनी मलनिःसारण देखभाल दुरुस्ती विभागाची माहिती या बैठकांमध्ये मागितली होती, पण अधिक्षक अभियंता तांदळे यांनी ही माहिती देण्यास टाळाटाळ केली. शहरातील तलाव आणि नदीमध्ये जलपर्णी काढण्यासाठी एक कोटी रुपयांची निविदा काढलेली असतानाही जलपर्णी जैसे थे असल्याचे चित्र आहे, त्यामुळे यासंदर्भातही माहिती मागितली होती, पण ती देखील न दिल्याने तांदळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. याची मुदत उलटून १५ दिवस होऊन गेले तरीही तांदळे यांनी अद्याप नोटीसला उत्तर दिले नाही.

मलनिःसारण विभागातील निविदा, निधीचे वाटप यासंदर्भातही आयुक्तांकडे अनेक तक्रारी आलेल्या आहेत. त्यामुळे याची सखोल चौकशी करणे आवश्‍यक आहे. यापार्श्‍वभूमीवर अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी आयुक्तांना पत्र देऊन तांदळे यांची चौकशी करणे आवश्‍यक आहे, त्यासाठी त्यांना मलनिःसारण विभाग प्रमुख पदावरून बाजूला करणे आवश्‍यक असल्याचे नमूद केले होते. त्यास आयुक्तांनी मंजुरी दिल्याने आज तांदळे यांची जबाबदारी काढून कार्यकारी अभियंता श्रीधर येवलेकर यांच्याकडे दिला आहे. दरम्यान, तांदळे यांची यासंदर्भात बाजू घेण्यासाठी वारंवार संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

‘मलनिःसारण विभागाच्या कामासंदर्भात संतोष तांदळे यांना नोटीस बजावली होती, पण त्यास त्यांनी उत्तर दिलेले नव्हते. त्यामुळे त्यांची विभागीय चौकशी करणे आवश्‍यक असल्याने त्यांचा कार्यभार काढून घ्यावा असे पत्र आयुक्तांना दिले होते. त्यानुसार त्यांना जबाबदारीतून मुक्त केले आहे. त्यांनी पुढील दोन दिवसात नोटीसला उत्तर दिले नाही किंवा नोटीसचे उत्तर समाधानकारक नसले तर त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल.’

- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT