Kamala Nehru Hospital Pune Sakal
पुणे

Pune Hospitals : पुणे महापालिकेच्या रुग्णालयांची ‘तब्येत’ सुधारणार

पुणे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार असले तरी तेथील असुविधांमुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक या रुग्णालयांकडे पाठ फिरवतात.

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार असले तरी तेथील असुविधांमुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक या रुग्णालयांकडे पाठ फिरवतात. रुग्णालयांमधील ही स्थिती सुधारण्यासाठी प्रशासनाने आराखडा तयार केला असून, प्रमुख तीन रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर, पुरेसे मनुष्यबळ, अत्याधुनिक उपचारांसह चांगली सुविधा देण्याचे नियोजन केले आहे. रुग्णालयांमधील खाटांची संख्या १६० ने वाढणार आहे. पुढील दोन महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे. या आराखड्यास आयुक्त विक्रम कुमार यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे.

मंगळवार पेठेतील कमला नेहरू रूग्णालय, भवानी पेठेतील सोनवणे रूग्णालय आणि येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयाचा यामध्ये समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात सिंहगड रस्त्यावरील लायगुडे रुग्णालय, शिवाजीनगर येथील दळवी रुग्णालय, हडपसर येथील मगर रुग्णालयाचा समावेश केला जाणार आहे.

पुणे महापालिकेतर्फे आरोग्य सेवेवर दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च केले जात असले तरी रुग्णसेवेबाबत अनेक तक्रारी आहेत. यामध्ये सुधारणा करण्यासाठी पहिल्या टप्प्यात तीन रुग्णालयांचा समावेश आहे. रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे, डॉक्टर, नर्स, इतर कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जाणार आहे.

अत्याधुनिक उपचार देता यावेत यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली जाणार आहे. रुग्णांना चांगली वागणूक, स्वच्छता याकडेही लक्ष दिले जाणार आहे. महापालिकेच्या या कामात खासगी कंपन्यांनी मदत करण्याची तयारी दाखविल्याने ‘सीएसआर’च्या माध्यमातून निधी व उपकरणे, वैद्यकीय साहित्य घेतले जाणार आहे.

अशी आहे सद्यःस्थिती

- राजीव गांधी रुग्णालयात ६०खाट आणि ७० कर्मचारी आहेत

- सोनवणे रुग्णालयात ७५ खाट आणि ५० कर्मचारी आहेत

- कमला नेहरू रुग्णालयात २८० खाट आणि सुमारे ३२५ कर्मचारी आहेत

- प्रसूती, बालरोग, डायलिसिस, डोळे तपासणी, ह्रदयरोग, अस्थिरोग, विविध प्रकारच्या चाचण्या यासह शस्त्रक्रिया केल्या जातात.

असे केले जाणार बदल

- या तिन्ही रुग्णालयातील खाटांची संख्या व मनुष्यबळात वाढ होणार

- राजीव गांधी रुग्णालय आणि सोनवणे रुग्णालयात प्रत्येकी २५ ते ३५ खाट वाढणार,

- कर्मचाऱ्यांची संख्याही प्रत्येकी २० ने वाढणार आहे.

- कमला नेहरू रुग्णालयातील खाटांची संख्या १०० ने वाढून ३८० होईल

- सध्या ३२५ कर्मचारी कार्यरत आहेत, ही संख्या ४२० पर्यंत जाणार आहे

- रेडिओलॉजिस्ट, सर्जन, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ यासह इतर रोगांवरील शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांची नियुक्ती होणार

- उपकरणांची संख्या वाढवून त्यांचा योग्य पद्धतीने वापर

- वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांना प्रशिक्षण देणार

- यासाठी वर्षाला सुमारे ४ कोटी रुपये खर्च

‘महापालिकेच्या प्रमुख तीन रुग्णालयात अद्ययावत पद्धतीने उपचार देता यावेत यासाठी तयार केलेल्या आराखड्यास आयुक्तांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. पुढील दोन महिन्यात तज्ज्ञ डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून या तिन्ही रुग्णालयात अद्ययावत सेवा सुरू केली जाईल. सध्या या रुग्णालयात अनेक रुग्ण उपचार घेत आहेत, पण भविष्यात येथे आणखी चांगल्या सुविधा देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.’

- डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य प्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT