Pune Municipal Sakal
पुणे

पुणे : महापालिकेत समाविष्ट किवळेगावास आला शहराचा लुक

डीपी रस्त्यामुळे जमिनीचे भाव गगनाला; गाळे बांधून भाड्याने देण्याला प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा

किवळे : किवळे परिसरात एकीकडे महापालिकेकडून रस्त्यांची कामे सुरू आहेत, तर दुसरीकडे वेगवेगळ्या गृह प्रकल्पांची संख्या वाढत आहे. परिणामी फ्लॅट धारकांची वाढत असलेली संख्येमुळे गावाला शहराचा लुक आला आहे. तर दुसरीकडे छोट्या-छोट्या मिनी मार्केटचे मार्केट वाढत आहे. (pune municipal corporation inclusion kiwale gaon city look)

किवळेगाव महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी एक खेडेगाव होते. अगदी दोन वर्षांपूर्वी अरुंद रस्त्यामुळे गृह प्रकल्पांची अत्यल्प संख्येमुळे हा भाग मागासलेपणाचा दिसत होता. किवळेत मुकाई देवीचे प्रसिद्ध आहे. जसा रावेत, किवळे, बीआरटी झाला. यास जोडून किवळे ते निगडी बीआरटी झाला. यामुळे या जोड रस्त्यास मुकाई चौक हे नाव देण्यात आले. त्यामुळे या नावाने हा चौक आज नावारूपाला आलेला आहे.

यासोबतच किवळेगावात सुरू झालेले सिंबॉयोसिस कॉलेज, जवळच असलेले हिंजवडी आयटीपार्क, द्रुतगती मार्गामुळे परिसरात टोलेजंग गृहप्रकल्प उभे राहिले. त्यामुळे इथे फ्लॅट घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढल्याने छोट्या-छोट्या मार्केटने बाळसे पकडण्यास मदत झाली. होलसेल किराणा दुकानांची संख्याही भागात वाढली. पालिकेमार्फत मुकाई चौक ते किवळे आणि किवळे ते रावेत गावठाण १८ मिटर (६० फूट रुंद) डीपी रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या बाजूला स्थानिकांच्या जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत. बहुतेकांनी रस्त्याच्या बाजूला गाळे काढून ते भाड्याने दिल्याचे रावेत किवळेदरम्यान येथील समीर लॉन्स समोर दिसत आहे. या भागात फ्लॅट धारकांची संख्या वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT