School sakal
पुणे

Pune News : महापालिकेत समाविष्ट गावांतील शाळा हस्तांतरणासाठी जोरदार हालचाली सुरु

पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळा महापालिककडे हस्तांतरण करण्यासाठी दोन्ही प्रशासनाने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत.

अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

कात्रज - पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळा महापालिककडे हस्तांतरण करण्यासाठी दोन्ही प्रशासनाने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी महापालिका आणि जिल्हा परिषदेने प्रत्येकी स्वतंत्र १५ अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.

समाविष्ट ३४ गावांतील एकूण ६५ शाळांच्या हस्तांतरणाची कार्यवाही या अधिकाऱ्यांमार्फत सुरु करण्यात आली असून ती अंतिम टप्प्यात आहे. लवकरात लवकर शाळा महापालिकेकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याने समाविष्ट गावांना दिलासा मिळणार आहे.

समाविष्ट गावातील शिक्षण लालफितीत अडकल्याचे वृत्त सकाळने प्रसिद्ध केले होते. महापालिकेकडून या शाळा हस्तांतरण करुन घेण्सास विलंब होत असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात येत होते. तर, महापालिककडून कागदांची पूर्तता करण्यास अडचणी निर्माण होत असल्याने विलंब होत असल्याचे सांगण्यात येत होते.

त्यानतंर आता या नोडल अधिकाऱ्यांमार्फत हवेली आणि मुळशी तालुक्यातील ६५ शाळांच्या ठिकाणी प्रत्यक्षस्थळी भेट देवून अभिलेख व मालमत्तेसंबंधित शाळाच्या मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांशी समन्वय ठेवून शाळांच्या मालमता व अभिलेख हस्तांतरणाची कार्यवाही करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया

गावे समाविष्ट झाल्यानतंर शाळांचे हस्तांतरण लवकरात लवकर होणे गरजेचे होते. मात्र, त्याला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. मात्र, आता या कामाला गती दिली जात असून हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. हस्तांतरण झाल्यास शाळांच्या प्रश्नांसंदर्भात महापालिककडे पाठपुरावा करता येणार आहे.

- व्यंकोजी खोपडे, माजी सरपंच, गुजर-निंबाळकरवाडी

शाळा हस्तांतरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. काही शाळांचे अहवाल प्राप्त झाले असून पुढील आठवड्यात सर्व शाळांची हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होईल. तसे पूर्ण शाळांचे अहवाल प्राप्त झाले की, पुढील प्रक्रिया करण्यात येईल.

- सुनंदा वाखारे, प्रशासकीय अधिकारी, शिक्षण विभाग, महापालिका

शाळेतील कागदपत्रे आणि विविध साहित्याची यादी करण्यात आली आहे. त्याच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ आणि एकहाती व्हावी यासाठी या नोडल अधिकाऱ्यांमार्फत काम करण्यात येत आहे. यामुळे महापालिकडे शाळा लवकरात लवकर हस्तांतरण करण्यास मदत होणार आहे.

- रमेश चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather update : दक्षिण महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता; विदर्भात तापमान वाढीचा इशारा

Virat Kohli Tattoo: विराट कोहलीने हातावर गोंदवला 'कमळ'; काय आहे, नवीन टॅटूचा खास अर्थ?

Latest Marathi News Live Update : वसईत ऋषिकेश वैद्यचा शोध सुरू; पुणे पोलिसांची विविध पथके रवाना

Electricity Rate: घरगुती ग्राहकांसाठी खुशखबर! महाराष्ट्रात वीजदर १० ते १४% ने कमी होणार; नवे दर कधी लागू करणार?

Pune Baramati Shuttle: पुण्यातून धावली ‘राजमाता जिजाऊ’ शटल; पुणे-बारामती मार्गावरील सेवेला प्रारंभ, महिला सुरक्षेला प्राधान्य!

SCROLL FOR NEXT