kothrud market sakal
पुणे

Pune : मंडईमध्ये मधुशाला'महानगरपालिकेच्या दवाखान्याशेजारी सुरु असलेल्या या प्रकाराला कोणाचा आशीर्वाद

कोथरुडच्या माथवड मंडईत राजरोस जुगार व दारुड्यांचा अड्डा

सकाळ वृत्तसेवा

कोथरुड : कोथरुड मधील बांधण्यात येत असलेल्या माथवड मंडईमध्ये राजरोसपणे काहीजण जुगाराचा धंदा चालवत असून दारुच्या पार्ट्या चालू असतात. मध्य वस्तीत, महानगरपालिकेच्या दवाखान्याशेजारी सुरु असलेल्या या प्रकाराला कोणाचा आशीर्वाद आहे, संबंधितांवर कडक कारवाई का होत नाही असा प्रश्न रहीवाशी विचारत आहेत.

माथवड मंडईच्या तीन मजली इमारतीचे काम अर्धवट अवस्थेत असून किती काम झाले आहे याची पाहणी करायला गेलेल्या बातमीदाराला तळमजल्यावर दारुच्या बाटल्यांनी भरलेली तीन पोती आढळली. वरील मजल्यांवर पाहणी केली असता दारुच्या बाटल्या, पत्त्याचे कॅट, खाद्यपदार्थाच्या रीकाम्या प्लेट आढळल्या. जवळच असलेल्या चाळीत चौकशी केली असता, एक व्यक्ती म्हणाला की, रस्त्यावर भाजी विक्रेत्यांची टोळी चालवणारी मंडळीच येथे जुगार व दारु अड्डा चालवतात. त्यांची येथे दहशत आहे. सर्व पातळीवर संबंध असल्यामुळे त्यांना कोणी रोखू शकत नाही.

येथील रहीवाशी सुरेखा मारणे म्हणाल्या की, मंडईच्या जागेत सुरु असलेला जुगारी व दारुड्यांचा धुडघुस रोखायला हवा. त्याबद्दल कोणीच कसे बोलत नाही. यासंदर्भात कोणी जबाबदारी घेणार आहे की नाही. संबंधितांवर कारवाई करावी.

युवराज मदगे म्हणाले की, मंडईच्या जागेत असे प्रकार चालतातच कसे. महापालिकेने व पोलिसांनी ताबडतोब संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी.

बेबीताई शिंदे म्हणाल्या की, माझी आई लोकप्रतिनिधी होती. तिच्या नावाने कोथरूड मध्ये असलेल्या मंडईचे नूतनीकरण करण्यात येत आहे. या जागेत दारू, जुगार चालतो व मनपा प्रशासन काहीही करत नाही हे ऐकून धक्का बसला व चीड ही आली आहे. तातडीने संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी व पुन्हा असे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

मनपा भवन रचना विभागाचे अधिकारी विरेंद्र केळकर म्हणाले की, सध्या निधी अभावी येथील काम बंद आहे . मनपा कर्मचाऱ्यांना तेथे पाहणी करायला सांगतो. योग्य ती उपाय योजना। करण्यात येईल.

कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील म्हणाले की, आत्तापर्यंत अशी कोणतीही तक्रार आली नव्हती. तातडीने कारवाई करत आहोत.

नागरिकांची मागणी

जुगार खेळणारे व दारु पिणारांवर कारवाई करावी

मंडईच्या गेटला कुलुप लावा.

सुरक्षा रक्षक नेमावा.

मंडईच्या जागेत पडलेला दारुच्या बाटल्यांचा ढीग

बैठकीवर अंथरलेले कापड, दारुच्या बाटल्या व पत्त्याचा कँट येथे किती जोरात व्यवसाय सुरु असतो हे सांगायला पुरेसे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC Election: “निवडणूक लढवता? मग हे लिहून द्याल का?” संकल्पनामा फेल झाला तर राजकारणालाही ब्रेक!

Malegaon News : तुकाराम मुंडेंच्या आदेशाला केराची टोपली; मान्यता रद्द असूनही मालेगावात अंधशाळा सुरूच

Union Budget 2026 : १ फेब्रुवारी रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार? शेअर बाजारही सुरू राहणार का?

मुस्ताफिजूर रहमानच्या हकालपट्टीचा राग बांगलादेशने भारतीय तरुणीवर काढला; ती म्हणाली, मला काही बोलायचे नाही, जय हिंद!

'अवैध धंदे बंद करताना कोणतीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मागे हटणार नाही'; नीतेश राणेंचा स्पष्ट इशारा

SCROLL FOR NEXT