Blood test sakal
पुणे

Pune Municipal Corporation : पालिकेच्या प्रयोगशाळा रुग्णांसाठी वरदान! कमी पैशांत आरोग्य सुविधा

‘प्रचंड अशक्तपणा व घाबरल्यासारखे होत असल्याने मी डॉक्टरांकडे गेले. त्या वेळी त्यांनी ईसीजी, बी१२, छातीचा एक्सरे, सोनोग्राफी, बीएसएल यासह इतर चाचण्या सांगितल्या.

​ ब्रिजमोहन पाटील

‘प्रचंड अशक्तपणा व घाबरल्यासारखे होत असल्याने मी डॉक्टरांकडे गेले. त्या वेळी त्यांनी ईसीजी, बी१२, छातीचा एक्सरे, सोनोग्राफी, बीएसएल यासह इतर चाचण्या सांगितल्या.

पुणे - ‘प्रचंड अशक्तपणा व घाबरल्यासारखे होत असल्याने मी डॉक्टरांकडे गेले. त्या वेळी त्यांनी ईसीजी, बी१२, छातीचा एक्सरे, सोनोग्राफी, बीएसएल यासह इतर चाचण्या सांगितल्या. खासगी प्रयोगशाळेत याचा खर्च ११ हजार रुपये सांगितल्याने मला धक्काच बसला. पुणे महापालिकेच्या जयाबाई सुतार रुग्णालयात कमी पैशांत सर्व चाचण्या केल्या जातात अशी माहिती मिळाली. तेथे गेल्यानंतर या सर्व चाचण्या पाच हजार ३०० रुपयांत झाल्या. कमी वेळेत आणि स्वच्छ, चांगल्या वातावरणात महापालिकेच्या दवाखान्यात या चाचण्या झाल्याने हा सुखद अनुभव होता,’’ असे सोनाली पाटील सांगत होत्या. अशाप्रकारे आत्तापर्यंत ३७ लाख ६६ हजार चाचण्या झाल्या आहेत.

कसे झाले शक्य?

  • खासगी प्रयोगशाळेत या चाचण्यांसाठी गेल्यानंतर मोठा खर्च येतो, अनेक नागरिकांना हा खर्च परवडणाराही नसतो.

  • शहरात कुठे स्वस्त चाचण्या होतात का, याचा शोध घेतात.

  • काही अपवादात्मक प्रयोगशाळा सोडल्यास बहुतांश ठिकाणचे दर हे थोड्याफार प्रमाणात सारखेच आहेत.

  • पुणे महापालिकेतर्फे गाडीखाना येथे प्रयोगशाळा अद्ययावत नसल्याने अतिशय मोजक्या चाचण्या केल्या जात होत्या.

  • महापालिकेने नागरिकांची ही अडचण ओळखून क्रस्ना डायग्नॉस्टिक सोबत खासगी भागीदारीतून (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप-पीपीपी) तत्त्वावर करार केला.

  • महापालिकेने या संस्थेला मोफत जागा दिली आहे. त्या बदल्यात या संस्थेकडून केंद्र सरकार आरोग्य योजनेच्या (सीजीएचएस) दरापेक्षा सहा टक्के कमी दराने नागरिकांना बायोकेमेस्ट्री, पॅथॉलॉजी, हिस्टॉलॉजी या तपासण्या केल्या जात आहेत.

या ठिकाणी आहे प्रयोगशाळा

मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालय आणि कोथरूड येथील सुतार रुग्णालयात या प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. येते रक्त, लघवी, सर्व प्रकारच्या सोनोग्राफी, एमआरआय, सिटीस्कॅन, टुडीइको, मॅमोग्राफी यासह ३९५ प्रकारच्या चाचण्या होतात. यासाठी या संबंधित संस्थेकडे तंत्रकुशल कर्मचारी, डॉक्टर असल्याने आजाराचे योग्य निदान होते.

४५ ठिकाणी सॅम्पल कलेक्शन

पुणे महापालिकेचे प्रसूतिगृह व सर्व दवाखाने अशा ४५ ठिकाणी रक्त, लघवीचे सॅम्पल कलेक्शन करण्याची सुविधा आहे. त्यामुळे नागरिकांना यासाठी कमला नेहरू किंवा सुतार रुग्णालयात जाण्याची वेळ पडत नाही.

२०१८ ते २०२२ या कालावधीत झालेल्या चाचण्या

  • ३५,००,००० - रक्त, लघवी चाचण्या

  • २८००० - सिटीस्कॅन

  • ३८००० - एमआरआय

  • २,००,००० - एक्स रे

महापालिकेने पीपीपी तत्त्वावर दोन ठिकाणी प्रयोगशाळा उभ्या केल्या आहेत. यामध्ये सर्व अत्याधुनिक यंत्रसामग्री असून, आजाराचे बिनचूक निदान केले जाते. २०१८ पासून ही सेवा सुरू असून ३५ लाखांपेक्षा जास्त चाचण्या येथे झालेल्या आहेत. खासगी प्रयोगशाळांपेक्षा इथले दर खूप कमी असून, सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फायदा होत आहे.

- डॉ. संजीव वावरे, साहाय्यक आरोग्यप्रमुख, महापालिका

डॉक्टरांनी सिटीस्कॅन करण्यास सांगितले होते. खासगी प्रयोगशाळेत ७५०० रुपये खर्च सांगितला होता. पण महापालिकेच्या प्रयोगशाळेत अडीच हजार रुपयेच खर्च आला.

- संदीप जोशी, नागरिक

महापालिकेच्या इतर सुविधा

  • कै. शंकरराव पोटे रुग्णालयात एमआरआय, डिजिटल एक्सरे, सोनोग्राफी सुविधा सीजीएचएस दरापेक्षा आठ टक्के कमी दराने मिळतात.

  • कमला नेहरू रुग्णालयात पीपीपी तत्त्वावर हृदयरोगावर उपचार, बायपास एन्जीओग्राफी, एन्जीओप्लस्टि सीजीएचएस दरापेक्षा पाच टक्के कमी दराने केली जाते.

  • कमला नेहरू रुग्णालय मंगळवार पेठ, राजीव गांधी रुग्णालय येरवडा, सोनवणे रुग्णालय भवानी पेठ, शिवरकर दवाखाना वानवडी, अरविंद बारटक्के दवाखाना वारजे, रखमाबाई थोरवे दवाखाना, मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह येथे ४०० रुपयांत डायलिसिस

  • बोरोडीतील दत्तात्रेय वळसे पाटील दवाखान्यात पीपीपी तत्त्वावर नेत्र रोग तपासणी व उपचार सीजीएचएस दरापेक्षा ७ टक्के कमी दराने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT