Pune Municipal Corporation not getting electricity meter replacement from MSEDCL Financial crisis pune esakal
पुणे

पुणे महापालिकेला खराब मिटरमुळे बसतोय आर्थिक फटका!

महावितरणकडून वीज मिटर बदलून मिळत नसल्याचा फटका महापालिकेला बसत आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेच्या इमारती, प्रकल्पांच्या ठिकाणी असलेली विजेचे मीटर खराब होऊन दोन वर्ष झाली, पण महावितरणकडून वीज मिटर बदलून मिळत नसल्याचा फटका महापालिकेला बसत आहे. महापालिकेचे २८१ मीटर खराब झाले असून, त्याचे अंदाजे बिल पाठवून दिले जात आहे. विद्युत विभागाने महावितरणकडे पत्र पाठवून मीटर बदलून देण्याची मागणी केली तरी अद्याप कार्यवाही झालेली नाही. महापालिकेच्या शाळा, रुग्णालये, विविध कार्यालये, उद्यान, पाणी पुरवठा केंद्र, मैला शुद्धीकरण प्रकल्प, पथदिवे यासह इतर ठिकाणी एकूण ३ हजार ७०० वीज मीटर बसविण्यात आलेले आहेत.

दरवर्षी २०.१० कोटी वीज युनिटचा वापर होऊन, त्या बदल्यात १५० कोटी पेक्षा जास्त वीज बिल महावितरणला भरावे लागते. महापालिकेकडून बिल भरण्यास विलंब झाल्यानंतर विद्युत पुरवठा खंडित करण्याचा प्रकारही घडतो. त्यामुले विद्युत विभागाकडून प्रत्येक महिन्याला वीज बिलाचा आढावा घेतला जातो. त्यामध्ये कुठले मीटर खराब झाले आहेत याची माहिती देखील मिळत. महापालिकेच्या शिवाजीनगर विभागातील ६०, कोथरूड ४८, बंडगार्डन ५३, पर्वती ५०, पद्मावती ३८, रास्तापेठ विभागातील ३२ मीटर असे २८१ मीटर खराब झाले आहेत. हे मीटर बदलावेत अशी मागणी महापालिका दोन वर्षापासून करत आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी मीटर क्रमांकासह वेळोवेळी पत्र पाठवून पाठपुरावाही केला आहे, पण अद्याप मीटर बदलले गेलेले नाहीत.

‘‘वीज मिटर खराब झाल्याने महावितरणकडून सहा महिन्याच्या बिलाच्या सरासरीनुसार बिल पाठवत आहेत. हे मीटर बदलून द्यावेत यासाठी दोन वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे. या वीज बिलाची आगामी काळात दुरुस्ती न झाल्यास जून २०२२ व त्यापुढील वीज बिले दुरुस्त होईपर्यंत भरणार नाही. तसेच त्यावरील व्याजाची आणि दंडाची रक्कम महापालिका भरणार नाही, असे पत्र महावितरणला दिले आहे.

- मनिषा शेकटकर, अधिक्षक अभियंता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT