pmt-bus sakal
पुणे

Pune : काळेबोराटेनगर रेल्वे गेट-संकेत विहार बससेवा पूर्ववत सुरू करावी

रस्ता खराब झाल्याने प्रशासनाने बससेवा केली बंद

सकाळ डिजिटल टीम, अशोक बालगुडे

उंड्री : दिवाळीच्या सुटीनंतर सोमवार (दि. 30 ऑक्टोबर)पासून शाळा सुरू झाल्या. मात्र, पीएमपी बस बंद असल्याने विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे. काळेबोराटेनगर (रेल्वे गेट क्र.8) शरीद फराटे चौक संकेत विहार दरम्यानची बंद केलेली बस शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

मागिल आठवड्यामध्ये परतीच्या पावसाने उपनगर आणि लगतच्या गावातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने काळेबोराटेनगर रेल्वे गेट क्र.8 ते संकेत विहार दरम्यानची बससेवा बंद केली आहे. दिवाळीच्या सुटीनंतर आता परिसरातील विद्यार्थ्यांना हडपसर गाव आणि परिसरातील शाळांमध्ये ये-जा करावी लागत आहे. खड्डेमय रस्त्यातून वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही कसरत करावी लागत आहे, असे वैशाली वरुडे, छाया दांगट, सोपान घोगरे यांनी सांगितले.काळेबोराटेनगर रेल्वेगेट क्र.8 ते संकेतविहार दरम्यानचा रस्ता उखडला असून, मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने बससेवा बंद केलेली बससेवा पूर्ववत करावी.

प्रा. बापूसाहेब शिंदे, काळेबोराटेनगर

दरम्यान, पीएमपीएमएलचे हडपसर आगारप्रमुख नारायण करडे म्हणाले की, पीएमपी प्रशासन विद्यार्थ्यांची वा प्रवाशांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेत आहे. पीएमपी बससेवा लवकरच पूर्ववत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT