Pune Municipal Corporation recruitment Process in June July 10 thousand applications for 320 seats sakal
पुणे

PMC Recruitment : पुणे महापालिकेत भरतीसाठी परीक्षा; जून, जुलैमध्ये प्रक्रिया; ३२० जागांसाठी १० हजार अर्ज

उमेदवारांना परीक्षेच्या सात दिवस आधी प्रवेशपत्र उपलब्ध केले जातील

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेने वर्ग एक ते तीनमधील रिक्तपदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ३२० जागांसाठी १० हजार १७१ अर्ज प्राप्त झाले आहेत. या पदांसाठी २२ जून आणि ५ जुलै या रोजी ऑनलाइन परीक्षा होणार आहेत. उमेदवारांना परीक्षेच्या सात दिवस आधी प्रवेशपत्र उपलब्ध केले जातील, असे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

पुणे महापालिकेने गेल्यावर्षी ४४८ रिक्त जागांची भरती केली होती. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्‍यात ३२० पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी सहा मार्च ते ३० एप्रिल दरम्यान अर्ज मागवले होते. या पदभरतीमध्ये आरोग्य विभाग, अग्निशामक विभागातील रिक्त पदे भरण्यावर भर देण्यात आला आहे.

२२ जून रोजी क्ष किरण तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, उप संचालक (प्राणी संग्रहालय), कनिष्ठ अभियंता (विद्युत), अग्निशामक विमोचन या पदांसाठी परीक्षा होईल. दोन जून रोजी आरोग्य निरीक्षक, वाहन निरीक्षक, पशु वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक या पदांसाठी परीक्षा होईल.

या ऑनलाइन परीक्षा तीन सत्रात होतील. परीक्षेच्या किमान सात दिवस आधी एसएमएस किंवा इ-मेलद्वारे युजर आयडी व पासवर्ड पाठवला जाईल. त्याद्वारे उमेदवार परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील, असे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी सांगितले.

औषधनिर्माता पदासाठी सर्वाधिक स्पर्धा

महापालिकेकडे आलेल्या अर्जांमध्ये सर्वाधिक स्पर्धा औषध निर्मातापदासाठी असल्याचे स्पष्ट होत आहे. औषध निर्माता पदाच्या १५ जागांसाठी ३ हजार ३२ अर्ज आले आहेत. अग्निशामक विमोचन पदाच्या २०० जागांसाठी ३ हजार ५५५ अर्ज केले आहेत. कनिष्ठ अभियंता (विद्युत) १० जागांसाठी १ हजार ६७७, वाहन निरीक्षकाच्या तीन जागांसाठी २१६ उमेदवारांचे अर्ज आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi Vs Goldy Brar : "बनाने वाले मिटाना भी जानते हैं" ; लॉरेन्स बिश्नोई टोळीचा गँगस्टर गोल्डी ब्रारवर पलटवार!

IND vs SA, 2nd ODI: मार्करमचं शतक अन् द. आफ्रिकेचा भारतावर रोमहर्षक विजय! ब्रेव्हिस-ब्रिट्सकेही चमकले; विराट-ऋतुराजची शतके व्यर्थ

Akola Police : २१ दिवसांची धाडसी शोधमोहीम यशस्वी; हरवलेल्या १४ वर्षीय बालकाचा शोध; अकोला पोलिसांची विशेष कामगिरी!

Dombivli Politics: 'तुम्ही एक घेणार तर आम्ही चार'; फोडाफोडीच्या वादावर भाजपचा शिंदेसेनेवर पलटवार, आरोप-प्रत्यारोपांचा महापूर

शुक्रवारी शाळा बंद आंदोलन! शिक्षण विभागाकडून वेतन कपातीचा इशारा; शिक्षकांची नेमकी मागणी काय?

SCROLL FOR NEXT