pune municipal corporation  Sakal
पुणे

पुणे : निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांचा अहवाल प्राप्त, पण कारवाई नाहीच

रस्त्यांना खड्डे पडल्याचा अहवाल प्राप्त होऊन जवळपास २० दिवस उलटून गेले तरी त्यानुसार ठेकेदारांवर कारवाई करण्याचा मुहूर्त महापालिकेला अद्याप मिळालेला नाही.

सकाळ वृत्तसेवा

रस्त्यांना खड्डे पडल्याचा अहवाल प्राप्त होऊन जवळपास २० दिवस उलटून गेले तरी त्यानुसार ठेकेदारांवर कारवाई करण्याचा मुहूर्त महापालिकेला अद्याप मिळालेला नाही.

पुणे - रस्त्यांना खड्डे पडल्याचा अहवाल प्राप्त होऊन जवळपास २० दिवस उलटून गेले तरी त्यानुसार ठेकेदारांवर कारवाई करण्याचा मुहूर्त महापालिकेला अद्याप मिळालेला नाही. दरम्यान, १३९ पैकी केवळ १७ रस्तेच खराब झाल्याचा अहवाल त्रयस्थ संस्थेने दिला आहे. त्यातही  ८ रस्त्यांना इतर विभागांनी केलेल्या खोदकामामुळे खड्डे पडले आहेत. तर ९ रस्ते हे दोष दायित्व कालावधीतील (डिफेक्ट लायबिलिटी पिरियड- डीएलपी) असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

पावसाळ्यात शहरातील रस्त्यांना मोठ्याप्रमाणात खड्डे पडल्याने पुणेकर त्रस्त झाले. मोठ्या रस्त्यांसह गल्लीबोळातील रस्त्यांची चाळण झाली. नागरिकांनी टीका सुरू केल्यानंतर महापालिकेने खड्डे दुरुस्ती सुरू केली. साडे आठ हजार खड्डे बुजवून देखील शहरात अद्यापही खड्ड्यांचे साम्राज्य आहे. गेल्या काही दिवसांपासून खड्डे बुजविण्याकडे पुन्हा दुर्लक्ष करण्यात आले आहे.

महापालिका आयुक्तांनी मुख्य पथ खात्याकडील १३९ डीएलपी मधील रस्त्यांची पाहणी करून त्यांची सद्यःस्थिती कशी आहे याचा अहवाल सादर करण्यासाठी इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड या त्रयस्थ संस्थेला नियुक्त केले होते. या संस्थेने शहरातील १३८ रस्त्यांची पाहणी करून २९ जुलै २०२२ रोजी अहवाल सादर केला आहे.

हा अहवाल नोंदविताना प्रत्येक रस्त्यावरील फोटो व सद्यःस्थिती काय आहे हे नमूद केले. त्यामध्ये सर्वाधिक १७ रस्त्यांवर खड्डे पडल्याचे निदर्शनास आले. या १७ पैकी तीन ठेकेदारांवर यापूर्वीच कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे. मात्र, त्यानंतर कारवाई करण्यात आलेली नाही.

इतर विभागांकडून कारवाई नाही

१७ पैकी ८ रस्त्यांना इतर विभाग म्हणजे पाणी पुरवठा, मलःनिसारण या विभागाकडून काम करताना रस्ते खोदण्यात आले. हे रस्ते निकृष्ट पद्धतीने बुजविण्यात आल्याने खड्डे पडले आहेत. पण या विभागांनाही ही यादी देण्यात आली नाही व त्यांच्याकडूनही ठेकेदारांवर कारवाई झालेली नाही.

रस्त्याचे नावे - ठेकेदार- खड्डे पडण्याचे कारण

श्रीकंट्रोल चौक ते काळूबाई मंदिर - दीपक कंस्ट्रक्शन - निकृष्ट काम

पंचमी हॉटेल ते राजीव गांधी इ लर्निंग स्कूल - धनराज असफाल्ट- निकृष्ट काम

अहिल्यादेवी चौक ते तीन हत्ती चौक - धनराज असफाल्ट - निकृष्ट काम

नॅन्सी लेक होम्स ते पद्मजा पार्क रस्ता - एस. एस. कंस्ट्रक्शन- निकृष्ट काम

केदारी पेट्रोल पंप - श्री योगेश कंस्ट्रक्शन - इतर विभागाकडून खोदकाम

लाल महाल चौक ते फडके हौद - शुभम कंस्ट्रक्शन - इतर विभागाकडून खोदकाम

शिवाजी रस्ता - देवकर अर्थमुव्हर्स - निकृष्ट काम

लोहियानगर, कासेवाडी रस्ता - विनोद मुठा- इतर विभागाकडून खोदकाम

महंमदवाडी रस्ता ते मारगोसा सोसायटी - गणेश एंटरप्रायझेस - इतर विभागाकडून खोदकाम

राजीव गांधी नगर वीर वस्ती - श्री योगेश कंस्ट्रक्शन - निकृष्ट काम

ताडीगुत्ता चौक ते सीसी रस्ता - सनशाईन कंस्ट्रक्शन -इतर विभागाकडून खोदकाम

संगमवाडी ते टिंगरेनगर रस्ता - यू. आर. फॅसिलिटी - निकृष्ट काम

उत्तरेश्‍वर रस्ता लोहगाव - श्रेयस कंस्ट्रक्शन - निकृष्ट काम

बावधन मुख्य रस्ता - आदर्श भारत एनव्हॅरो प्रा. लि.- इतर विभागाकडून खोदकाम

गणेशखिंड रस्ता ते धोत्रे पथ - पावेवय कन्स्ट्रक्शन- इतर विभागाकडून खोदकाम

हरेकृष्ण पथ - पावेवय कन्स्ट्रक्शन- निकृष्ट काम

क्रीडासंकुल ते म्हाळुंगे गावठाण रस्ता - शुभम कंस्ट्रक्शन - इतर विभागाकडून खोदकाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT