Mall Sealed By PMC  sakal
पुणे

Mall Sealed By PMC : मॉलच्या करआकारणीवर हरकत; २५ लाख रुपयांचा धनादेश जमा

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाच्या नावाने असलेल्या इमारतीच्या मिळकतकराची थकबाकी न भरल्याने पुणे महापालिकेने ही इमारत सील केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाच्या नावाने असलेल्या इमारतीच्या मिळकतकराची थकबाकी न भरल्याने पुणे महापालिकेने ही इमारत सील केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. बुधवारी (ता. २८) संबंधितांकडून महापालिकेला २५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला असून, या थकबाकीवर आक्षेप घेण्यात आल्याने पुणे महापालिकेने यावर सुनावणी घेण्याचे ठरविले आहे.

डेक्कन जिमखाना येथील एक मॉल केंद्रीय मंत्री व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर आहे. महापालिकेच्या मिळकतकराच्या बिलावर देखील त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे आहेत. तरीही महापालिकेने बुधवारी हा मॉल केंद्रीय मंत्री व त्यांच्याशी संबंधित व्यक्तीचा नसल्याचा चक्क लेखी खुलासा केला आहे. दरम्यान, या मॉलच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याची तीन कोटी ७७ लाख रुपये इतकी थकबाकी होती. त्यामुळे ही मिळकत सील केली होती.

डेक्कन येथील मॉलने २५ लाखांचा धनादेश दिलेला आहे. थकबाकीबाबत संबंधितांचे आक्षेप असून त्यावर सुनावणी घेऊन योग्य ती कर आकारणी केली जाईल.

— माधव जगताप, उपयुक्त, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अर्धनग्न करत केस कापले, महिलेला अमानुष मारहाण, मंदिर प्रवेशाचा वाद, ठाण्यातील धक्कादायक प्रकार

Mobile Hacking Signs : तुमचा कॉल कुणी ऐकत आहे का? मेसेज सिक्रेटली वाचत आहे का? 'ही' आहेत मोबाईल हॅक झाल्याची 5 लक्षणे

शनी अमावस्येला विवाहिता मध्यरात्री मित्रासोबत अघोरी पूजेसाठी शेतात गेली; भोंदूबाबाने दोघांनाही संपवलं, धुळे हादरलं

Latest Marathi News Live Update : Mulshi: मुळशीत चांदे-मूलखेड रस्त्यावर रिक्षा आणि फॉर्च्युनर गाडीची जोरदार धडक

Global Economy: कोरोना, युद्ध अन् ऊर्जा संकटाने दशकभराच्या विकासावर पाणी; पुन्हा गरिबी ओढावण्याची भीती : PM मोदी

SCROLL FOR NEXT