unfinished projects sakal
पुणे

Pune Municipal Corporation : महापालिकेवर नामुष्की; अपूर्ण प्रकल्पांचा घेणार शोध

अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतींची नेमकी माहिती महापालिकेच्या प्रशासनाकडे नसल्याचे झाले उघड.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतींची नेमकी माहिती महापालिकेच्या प्रशासनाकडे नसल्याचे उघड झाले आहे. अशा इमारती, प्रकल्प शोधून त्याचा अहवाल भवन विभाग तयार करणार आहे. ८० टक्के काम पूर्ण असलेल्या बांधकामांना निधी उपलब्ध करून त्या इमारती वापरात आणण्यात येणार आहेत.

पालिकेच्या ४० हजार कोटींपेक्षा जास्त मालमत्ता

पुणे शहरात महापालिकेच्या मालकीची समाज मंदिरे, शाळा, नाट्यगृहे, क्रीडांगणे, दवाखाने, रुग्णालये, बहुउद्देशीय केंद्रे, क्षेत्रीय कार्यालये, इतर प्रशासकीय इमारती, मोकळ्या जागा, मैदाने, ॲमिनिटी स्पेस अशी मालमत्ता आहे. त्यांचे मूल्यांकन ४० हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे.

बांधकामासाठी भवन विभागाकडून निधी उपलब्ध करून देणे, निविदा प्रक्रिया करणे हे काम केले जाते. तर विद्युतविषयक कामे विद्युत विभागाकडून केली जातात. अंदाजपत्रकात भवन विभागासाठी किमान ४०० कोटी, तर विद्युत विभागाला ३० कोटी रुपयांपर्यंत तरतूद उपलब्ध असते.

निधीअभावी रखडली कामे

गेल्या काही वर्षांत नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात समाज मंदिर, शाळा, दवाखाना, आरोग्य कोठी, रुग्णालये, क्रीडांगण, जलतरण तलाव बांधण्यासाठी प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करून घेतले. निधीअभावी ही कामे रखडली आहेत. महापालिकेत दीड वर्षापासून प्रशासक आहे.

रंगकाम, खिडक्या, दरवाजे बसविणे, विद्युत व्यवस्था, एखाद्या खोलीचे काम अपूर्ण असणे, अर्धवट कामे असलेल्या इमारतींची संख्या किती, याचा आकडा भवन व विद्युत विभागाकडे नाही. या कामांनाही निधीची गरज आहे.

असे एकूण किती प्रकल्प आहेत, त्यांचे आतापर्यंत झालेले काम व आवश्यक निधीचा अहवाल भवन विभागाने मागितला आहे. ज्यांची कामे ८० टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण आहेत अशा प्रकल्पांची रखडलेली किरकोळ कामे प्राधान्याने मार्गी लावून इमारतींचा वापर सुरू केला जाईल.

- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir: काश्मीरच्या कुलगाममध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; मजुरांवर दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या तरुणाचा मृत्यू

उपमुख्यमंत्र्याच्या बैठकीला हजेरी, घरी जाताच घेतली ४५ लाखांची लाच; बीडमध्ये विभागीय वनअधिकाऱ्यांला रंगेहात पकडलं

Commonwealth Games 2026: पाच मिनिटांत दुसरे सुवर्ण! हर्ष सिंगची ज्यूदोत 'Golden' कामगिरी; भारतीय जवानाने प्रतिस्पर्धीला आसमान दाखवले

MBBS Bond: एमबीबीएस डॉक्टरांचा ‘बॉण्ड’ अखेर रद्द! राज्य शासनाचा मोठा निर्णय; वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे धोरणात बदल

Dhom Dam: वाईत धोक्याची घंटा! धोम धरणाचा विसर्ग वाढला; महागणपती मंदिरात घुसले पुराचे पाणी

SCROLL FOR NEXT