Water Tanker esakal
पुणे

Water : बांधकामासाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरा अन्यथा कारवाई

पुणे महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात शुद्ध केलेले पाणी बांधकामासाठी वापरणे बंधनकारक केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात शुद्ध केलेले पाणी बांधकामासाठी वापरणे बंधनकारक केले आहे. पण शहरातील अनेक बांधकाम व्यावासायिक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने महापालिकेने बांधकामाच्या ठिकाणी पाहणी करून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

यासंदर्भात क्रेडाई आणि मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेला पात्र पाठविले असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

एल निनो'च्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे महापालिकेने हे पत्र काढले आहे. महापालिकेतर्फे दिले जाणारे पिण्याचे पाणी, बोअरवेलाचा वापर करून हे पाणी बांधकामासाठी वापरणे अभिप्रेत नाही. पुणे महापालिकेच्या एसटीपी मधील प्रक्रिया केलेले पाणी टँकरमधून घेऊन जावे यासाठी यापूर्वीही सूचना दिलेल्या आहेत. त्यासाठी टॅंकर पॉइंटही उभारले आहेत. या वर्षी पाणी टंचाई निर्माण होण्याच्या शक्यतेने महापालिका आयुक्तांच्या आदेशाचे पालन करावे असे महापालिकेने पत्राद्वारे कळविले आहे, असे पावसकर यांनी सांगितले.

महापालिकेची यंत्रणा अपुरी

शहराच्या सर्वच भागा बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. त्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. पण महापालिकेने शहरातील ९ एसटीपी केंद्रांवर टॅंकर पॉइंट सुरू केले आहेत आणि केवळ २० टँकर पाणी पुरवठा करण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे ही महापालिकेची यंत्रणा अपुरी असल्याचे समोर आले आहे. ही यंत्रणा आणखी सक्षम करणे आवश्‍यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

Kankavli Assault Case: गणपतीला माहेरी आली, जमिनीच्या वादातून आई-भावंडांसह पाच जणांकडून बेदम मारहाण

सासूसोबत जिनिलीयाचं खास बॉण्डिंग, घरच्या गणपतीची लगबग; देशमुख कुटुंबाचे फोटो व्हायरल

Latest Marathi News Update : धनुष्यबाण राहणार की जाणार? शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुनावणी

IND vs AFG, T20I: मालिका जिंकण्यासाठी भारत सज्ज! सॅमसनच्या कामगिरीकडे लक्ष, पाचव्या गोलंदाजाची चिंता कायम; कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT