Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporation Sakal
पुणे

पुणे महापालिकेचे वारंवार कर बुडविणाऱ्यांना ‘अभय’!

सकाळ वृत्तसेवा

पुणे महापालिकेने मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी २०२०-२१ मध्ये अभय योजना राबविली होती.

पुणे - महापालिकेने (Pune Municipal Corporation) मिळकतकराची (Property Tax) थकबाकी (Arrears) वसूल (Recovery) करण्यासाठी २०२०-२१ मध्ये अभय योजना (Abhay Yojana) राबविली होती. याचा दीड लाख थकबाकीदारांनी लाभ घेतला. मात्र त्यापैकी ४५ हजार ७४५ जणांनी २०२१-२२ मध्ये पुन्हा तब्बल १५१ कोटी रुपयांची थकबाकी निर्माण केली आहे. त्यामुळे वारंवार कर बुडविणाऱ्या मिळतकधारकांना अभय योजनेत दिलेली दंडमाफीची सवलत रद्द करा, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे.

या योजनेत १ लाख ४९ हजार ७०० थकबाकीदारांनी सुमारे साडेचारशे कोटींचा कर भरला होता. आता या सर्व मालमत्ताधारकांनी गेल्या वर्षी २०२१-२२ वेळेवर मालमत्ता कर भरला आहे का, याची माहिती घेतली असता धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

  • १,१९,२७२ - निवासी मिळकतधारकांनी लाभ घेतला होता

  • ३६,२२९ - त्यातील नागरिकांनी पुन्हा २०२१-२२ मध्ये ४० कोटींची थकबाकी निर्माण केली

  • २३,३२ - बिगरनिवासी मिळकतधारकांनी अभय योजनेत सहभाग घेतला

  • ७,१५४ - त्यापैकी २०२१-२२ मध्ये ९७ कोटींची थकबाकी केली

  • ३ हजार १४८ - मोकळ्या जागांसाठी अभय योजनेचा लाभ घेतला

  • ९४५ - त्यापैकी पुन्हा ७ कोटी रुपये थकविले आहेत

  • ४,२५६ - मिश्र वापर असलेल्या मिळकतधारकांनी अभय योजनेचा फायदा घेतला

  • १,४१८ - त्यापैकी जणांनी सात कोटी रुपये थकविले

अभय योजना म्हणजे प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांवर अन्याय आहे. या योजनेचा फायदा घेऊन ज्यांनी पुन्हा कर थकविला आहे, त्यांना दिलेली ७५ टक्क्यांची सवलत रद्द करा व ही रक्कम वसूल करा. तसेच भविष्यात अभय योजनेचा फायदा त्यांना पुन्हा दिला जाऊ नये.

- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT