पुणे

महापालिकेच्या चहापाण्यावर सव्वातीन लाखांचा खर्च

CD

पुणे, ता. १९ ः पुणे महापालिकेतील विषय समित्यांच्या बैठकांसाठी चहा व अन्य खाद्यपदार्थ पुरविले जातात. पण निविदेविना याचे बिल मंजूर केले जात आहे. आतापर्यंत तीन लाख २० हजार रुपयांचा खर्च झाल्याचे माहिती अधिकार कायद्यातून समोर आले आहे.
माहिती अधिकार फोरमचे सदस्य उमेश नाईक यांनी माहिती अधिकारातून ही माहिती मागवली होती. ही माहिती नगरसचिव विभागाने दिली आहे. यामध्ये सर्वाधिक खर्च हा स्थायी समितीच्या बैठकीत झाला आहे. दोन लाख ७० हजार १४० रुपयांचा चहा स्थायी समितीच्या बैठकीत प्यायल्याचे माहितीतून समोर आले आहे. त्या खालोखाल नाव समितीचा खर्च १५ हजार ७१६ रुपये, विधी समितीचा खर्च १४ हजार १३४ रुपये, शहर सुधारणा समितीचा खर्च १० हजार २४८ रुपये आणि महिला व बाल कल्याण समितीच्या बैठकीत आठ हजार ७८८ रुपयांचा चहा प्यायल्याची माहिती देण्यात आली. क्रीडा समितीच्या बैठकीच्या चहाचे बिल मात्र केवळ ४२० रुपये इतके झाले आहे. महापालिकेत प्रत्येक गोष्टीसाठी निविदा काढली जाते किंवा कोटेशन घेऊन खर्च केला जातो. पण चहापाण्याच्या खर्चासाठी कोणतीही प्रक्रिया पार पाडली जात नाही. चहा पुरवठा करणाऱ्या हॉटेलचालकांच्या बिलांचा आणि प्रत्यक्षात आलेल्या चहाचा मेळ घातला जात नाही, थेट बिल काढून पैसे दिले जातात. या प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, अशी मागणी नाईक यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘प्रश्न विचारणं हा विद्यार्थ्यांचा स्वभाव’; ‘छात्रों की गूंज’मधून राहुल गांधींचं पुन्हा सरकारवर टीकास्र, नेमकं काय म्हणाले?

Muslim Family: दहा वर्षांपासून मुस्लिम कुटुंबाच्या घरी गौरीचा जागर; लोहाऱ्यात धार्मिक सलोख्याची अनोखी परंपरा

दीपिका-रणवीरने केली दुसऱ्या बाळाच्या जन्माची घोषणा, 'दुआ' बनली मोठी बहीण; पाहा पोस्टमध्ये काय लिहिलंय

Latest Marathi News Update : ८ महिन्यांची चिमुकली अचानक बेपत्ता; संशयित आरोपीनं संपवलं जीवन

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांकडून २५०० पानी चार्जशीट दाखल

SCROLL FOR NEXT