Pune Municipal Award sakal
पुणे

Pune Municipal Award : पुणे महापालिकेला राज्य सरकारकडून तृतीय पुरस्कार

उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्य सरकारकडून ‘माझी वसुंधरा अभियान ३.०’ याअंतर्गतचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पुणे महापालिकेला प्राप्त झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कचरा व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण, वृक्षारोपण अशा विविध घटकांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्य सरकारकडून ‘माझी वसुंधरा अभियान ३.०’ याअंतर्गतचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पुणे महापालिकेला प्राप्त झाला आहे. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

राज्य सरकारच्यावतीने पर्यावरण जनजागृतीसाठी ‘माझी वसुंधरा अभियान ३.०’ हे अभियान राज्य पातळीवर राबविले आहे. या अभियानाचे यंदा तिसरे वर्ष आहे. त्यादृष्टीने सोमवारी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून यंदाच्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मुंबई येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, उपायुक्त माधव जगताप, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, सल्लागार पूजा ढोले यावेळी उपस्थित होत्या.

या कामासाठी मिळाला पुरस्कार

‘माझी वसुंधरा’ या अभियानांतर्गत विविध घटकांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना राज्य सरकारकडून पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला जातो. ‘माझी वसुंधरा अभियान ३.०’ मध्ये भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या पंचमहाभूतांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियान कालावधीत केलेल्या कामाचे मूल्यमापन करण्यात आले होते.

या स्पर्धेअंतर्गत ‘१० लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली अमृत शहरे’ या गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल पुणे महानगरपालिकेस तृतीय क्रमांक जाहीर करण्यात आला. दरम्यान, पिंपरी चिंचवड शहराने प्रथम क्रमांक तर नवी मुंबईने द्वितीय क्रमांक पटकाविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

SCROLL FOR NEXT