Pune Corporation Budget sakal
पुणे

Pune Corporation Budget : पुणे महापालिकेचा आज अर्थसंकल्प

पुणेकरांच्या जीवनावर थेट परिणाम करणारा पुणे महापालिकेचा २०२४-२५ चा अर्थसंकल्प उद्या (ता. ७) महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे स्थायी समितीला सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून पुणेकरांना काय मिळणार, याकडे लक्ष लागलेले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणेकरांच्या जीवनावर थेट परिणाम करणारा पुणे महापालिकेचा २०२४-२५ चा अर्थसंकल्प उद्या (ता. ७) महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे स्थायी समितीला सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून पुणेकरांना काय मिळणार, याकडे लक्ष लागलेले आहे.

महापालिकेवर प्रशासकराज आल्यापासून विक्रम कुमार हे यंदा तिसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहेत. गेल्या वर्षी ९ हजार ५९२ कोटींचा अर्थसंकल्प सादर केलेला होता. यंदा महापालिकेचा अर्थसंकल्प दहा हजार कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार आयुक्तांनी १५ जानेवारीपर्यंत स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प मांडणे आवश्यक आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेवर प्रशासक असल्याने अर्थसंकल्पाबाबत स्थायी समिती आणि मुख्य सभेत निर्णय होत नाही. त्यामुळे या ठरावाला बगल देत मार्च महिन्यातच अर्थसंकल्प मांडण्यावर आयुक्तांनी भर दिलेला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांत लागणार असताना समाविष्ट झालेल्या गावांमधील पायाभूत सुविधा, उड्डाणपूल, समतल विलगक, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, नदी सुधार या प्रकल्पांसह पुणेकरांसाठी कोणत्या योजना आयुक्त आणणार आहेत? त्यासाठी किती निधी असणार आहे? याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT