Pune Municipal corporation Traffic changes Golf Club Chowk in Yerawada pune
Pune Municipal corporation Traffic changes Golf Club Chowk in Yerawada pune  sakal
पुणे

येरवडा येथील गोल्फ क्‍लब चौक येथे वाहतुकीत बदल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महापालिकेकडून येरवडा येथील गोल्फ क्‍लब चौकाच्या परिसरातील उड्डाणपुलाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी खांबावर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी गोल्फ क्‍लब चौकातुन जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतुक शाखेचे पोलिस आयुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे. गोल्फ क्‍लब चौकातील वाहतुकीमध्ये बदल करण्याचे काम येरवडा वाहतुक शाखेच्यावतीने करण्यात आले आहे. त्यानुसार, वाहतुकीत बदल करुन पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

दुचाकी व हलक्‍या वाहनांवर काही प्रमाणात निर्बंध

येरवडा वाहतुक शाखेकडून उड्डाणपुलाच्या कामामुळे हलक्‍या वाहनांवर काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार आंबेडकर चौकातुन गोल्फ क्‍लब चौकमार्गे शास्त्रीनगर चौकाकडे जाणारी दुचाकी व हलकी वाहने गोल्फ क्‍लब चौकातुन डावीकडे वळून जीएसटी भवन येथून वळसा घालून गोल्फ क्‍लब चौकातुन डावीकडे वळून शास्त्रीनगर चौकाकडे जाईल. शास्त्रीनगर चौकाकडून गोल्फ क्‍लब चौकामार्गे आंबेडकर चौकाकडे जाणारी दुचाकी व हलकी वाहने गोल्फ क्‍लब चौकातुन डावीकडे वळून पुलाला वळसा घालून पुढे गोल्फ क्‍लब चौकातुन डावीकडे वळून आंबेडकर चौकाकडे जातील, असे

वाहतुक बंद

शास्त्रीनगर चौकाकडून गोल्फ क्‍लब चौकमार्गे आंबेडकर चौकाकडे जाणाऱ्या व आंबेडकर चौकाकडून शास्त्रीनगरकडे जाणाऱ्या जड वाहतुकीस बंदी

पर्यायी मार्ग

  • शास्त्रीनगर चौकाकडून आंबेडकर चौकाकडे जाणारी वाहतुक शास्त्रीनगर चौक सरळ गुंजन चौक,पर्णकुटी चौकातुन डावीकडे वळून महात्मा गांधी चौक तेथून आंबेडकर सेतुवरुन तारकेश्‍वर चौक , चंद्रमा चौक, पुढे आळंदी रस्त्याने इच्छित स्थळी जावे

  • आंबेडकर चौकातुन गोल्फ क्‍लब चौकमार्गे शास्त्रीनगर चौकाकडे जाणारी वाहतुक आंबेडकर चौक, सादलबाबा चौक, डावीकडे वळून गुंजन चौक, तेथून शास्त्रीनगर चौकमार्गे पुढे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT