Bribe case  esakal
पुणे

Pune Crime : महापालिकेच्या वाहन विभागातील कर्मचारी लाच घेताना ताब्यात

पुणे महापालिकेच्या गाडीवर दररोज काम नेमून देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेताना महापालिकेतील एका कर्मचाऱ्यास ताब्यात घेण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापालिकेच्या गाडीवर दररोज काम नेमून देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेताना महापालिकेतील एका कर्मचाऱ्यास ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी एका ३२ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली होती. त्यावरून पांडुरंग साधू लोणकर (वय ५७) यांच्याविरुध्द खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार हे खासगी कंत्राटी वाहनचालक आहेत. तर पांडुरंग लोणकर हे महापालिकेच्या गुलटेकडी येथील वाहन विभागात कार्यरत आहेत.

लोणकर यांनी तक्रारदारास गाडीवर दररोज काम नेमून देण्यासाठी चार हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात १६ ऑगस्ट रोजी अर्ज दिला. त्यावर स्वारगेट परिसरात सापळा रचून लोणकर यांना लाच घेताना ताब्यात घेतले.

‘एसीबी’चे पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वीरनाथ माने, पोलिस कर्मचारी रियाज शेख, पांडुरंग माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WOMEN'S ASIA CUP 2026 FINAL: पाकिस्तानचा पत्ता कट अन् भारतासमोर श्रीलंकेचं आव्हान! महिला एशिया कप फायनल कधी, कुठे आणि किती वाजता?

CM Devendra Fadnavis : विदर्भ बनणार ‘मायनिंग-ग्रीन स्टील हब’; खाण क्षेत्र अर्थव्यवस्थेत अर्धा ट्रिलियन डॉलरचे योगदान

मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ ते ९ किमी रांगा; प्रवाशी संतप्त

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

SCROLL FOR NEXT