Bribe case  esakal
पुणे

Bribe Case : महापालिकेच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यास लाच घेताना अटक

पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातून ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातून ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. चतु:शृंगी पाणीपुरवठा विभागात ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश राजाराम कवठेकर (वय ५४) असे या मीटर रिडरचे नाव आहे. तक्रारदार हे परवानाधारक प्लंबर आहेत. एका बांधकाम व्यावसायिकाला शिवाजीनगर, भांबुर्डा येथील मिळकतीसाठी पाणीपुरवठा विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घ्यायचे होते.

त्यासाठी तक्रारदार यांनी कर्वे रस्त्यावरील चतु:शृंगी पाणीपुरवठा विभागात अर्ज केला होता. तक्रारदार पाणीपुरवठा विभागात गेले. त्यावेळी कवठेकर याने ना-हरकत प्रमाणपत्रासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने ‘एसीबी’च्या कार्यालयात अर्ज दिला.

अर्जाच्या पडताळणीत कवठेकर याने दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी प्रत्येकी १० हजार रुपये आणि स्वत:साठी पाच हजार रुपये असे एकूण २५ हजारांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ‘एसीबी’च्या पथकाने मंगळवारी (ता. ११) चतु:शृंगी पाणीपुरवठा विभागात सापळा रचून कवठेकर याला लाच घेताना ताब्यात घेतले, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक नितीन जाधव यांनी दिली.

‘एसीबी’चे पोलिस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त अधीक्षक शीतल जानवे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप वऱ्हाडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT