pune municipal corporation will reopen the kondhwa laboratory sakal
पुणे

Pune News : कोंढव्यातील प्रयोगशाळा सुरु होण्याची शक्यता

चार वेळा निविदा काढल्यानंतर तीन संस्थांनी ही प्रयोगशाळा सुरु करण्यासाठी प्रतिसाद दिला

सकाळ वृत्तसेवा

Pune News : पुणे महापालिकेने कोंढवा येथे उभारलेली अत्याधुनिक प्रयोगशाळा गेल्या चार वर्षापासून बंद आहे. ही प्रयोगशाळा सुरु करण्यासाठीच्या हालचाली प्रशासनाने सुरु केल्या आहेत. चार वेळा निविदा काढल्यानंतर तीन संस्थांनी ही प्रयोगशाळा सुरु करण्यासाठी प्रतिसाद दिला आहे.

त्यातील एका संस्थेची स्थायी समितीमार्फत निवड केली जाणार आहे. त्यामुळे ही प्रयोगशाळा सुरु होण्याची शक्यता आहे. अन्न, विविध प्रकारेच खाद्य पदार्थ, पॅकिंग केलेले पदार्थ, पाणी याची तपासणी करण्यासाठी पुणे महापालिकेने २०११ मध्ये प्रयोगशाळा उभारली.

त्यानंतर सुमारे पावणे आठ कोटी रुपयांची उपकरणे खरेदी केली. ही प्रयोगशाळा चालविण्यासाठी पाच वर्षासाठी एका वर्षासाठी देण्यात आली होती. २०१३ मध्ये ही प्रयोगशाळा एका संस्थेला चालविण्यात देण्यात आली होती.

यावेळी झालेल्या करारात या प्रयोगशाळेतून दरवर्षी महापालिकेला सुमारे ५० लाख रुपयांचा फायदा होईल असे नमूद करण्यात आले होते. पण प्रत्यक्षात २०१३-१४ ते २०१७-१८ या पाच वर्षात फक्त १२ लाख ७८ हजार रुपये उत्पन्न मिळाले होते. तसेच ही रक्कम प्रयोग शाळेचे काम बघणाऱ्या कनिष्ठ लेखनिकाच्या पगारावर खर्च झाली.

दरम्यान त्यानंतर या संस्थेसोबत नव्याने करार न केल्याने प्रयोगशाळा बंद झाली, २०२२ मध्ये या संस्थेला पुन्हा काम देण्याचा निर्णय स्थायी समिती व मुख्य सभेने घेतला होता. पण अनामत रक्कम न भरल्याने प्रयोगशाळा सुरु होऊ शकली नाही.

अखेर आरोग्य विभागाने ही निविदा रद्द करून नव्याने निविदा काढण्याचा निर्णय घेतला. या निविदेला तीन वेळा मुदतवाढ दिली पण एकाही संस्थेने अर्ज भरला नाही. अखेर चौथ्यावेळेस काढलेल्या निविदेत तीन संस्थांनी निविदा भरली आहे.

त्यांच्या कागदपत्रांची छाननी, आर्थिक विषयक बाबी तपासल्यानंतर त्यांचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर केला जाईल. तेथे मान्यता मिळाल्यानंतर ही प्रयोगशाळा सुरु होणार आहे.

पशुवैघकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे म्हणाल्या, ‘‘ कोंढव्यातील प्रयोगशाळा सुरु करण्यासाठी चार वेळा निविदा काढली. चौथ्या वेळेस तीन संस्थांनी अर्ज भरले आहेत. यातील एक निविदा मंजूर झाल्यानंतर या प्रयोग शाळेचे काम सुरू होईल. या प्रयोगशाळेत नागरिकांना सवलतीच्या दरात अन्न, खाद्य पदार्थ, तेल, तूप, दूध, पाणी यासह इतर सर्व पदार्थांच्या गुणवत्तेसंदर्भात तपासणी करून मिळेल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Duleep Trophy Final : तिलक वर्मा एकटा लढला, शतकाला एका धावेने हुकला; इशानच्या संघाकडे ३७२ धावांची आघाडी Video

रिल्सचा नाद, इंटरनेट सारखं बंद पडल्यानं व्हिडीओ अडकायचे; ५२ वर्षीय महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT