Pune Municipal Corporation sakal
पुणे

Pune Municipal Corporation : योगिता भोसलेंकडे नगरसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार

पुणे महापालिकेच्या नगरसचिवपदाचा अतिरिक्त पदभार असणारे मुख्य कामगार अधिकारी तथा सह आयुक्त शिवाजी दौंडकर हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे महापालिकेच्या नगरसचिवपदाचा अतिरिक्त पदभार असणारे मुख्य कामगार अधिकारी तथा सह आयुक्त शिवाजी दौंडकर हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे १ जून पासून नगरसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार आता राजशिष्टाचार अधिकारी योगिता भोसले यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबत आदेश काढले आहेत.

सुनील पारखी हे अनेक वर्ष ‘नगरसचिव’ होते, ते आॅगस्ट २०२० मध्ये सेवानिवृत्त झाल्यापासून शिवाजी दौंडकर यांच्याकडे या अतिरिक्त पदभार होता. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर ही जबाबदारी कोणाला मिळणार अशी चर्चा सुरू होती, त्यामध्ये आयुक्तांनी ही जबाबदारी योगिता भोसले यांच्याकडे सोपविली आहे.

दरम्यान, महापालिकेची मुख्यसभा, स्थायी समितीसह इतर सर्व समित्यांचे काम कायद्यानुसार चालविण्याचे आणि निर्णय घेण्याचे अधिकार नगरसचिवांना असतात. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राखणे, कोणाच्या दबावापेक्षा कायद्याला धरून निर्णय घ्यावे लागतात त्यामुळे नगरसचिवाची जबाबदारी मोठी आहे.

भरतीमध्ये एकही अधिकारी पात्र नाही

सुनील पारखी सेवानिवृत्त झाल्यानंतर आयुक्त विक्रम कुमार यांनी भरती प्रक्रिया राबविली. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले असता २५ जणांनी अर्ज केले. पण आयुक्तांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्या पदासाठी सक्षम उमेदवार न मिळाल्याने ही जागा रिक्तच राहिली. त्यामुळे दौंडकर यांच्याकडेच अतिरिक्त कार्यभार होता आता तो भोसले यांच्याकडे देण्यात आला आहे. दरम्यान, महापालिकेने पुन्हा पदभरती सुरू केली असल्याने त्यामध्ये आता नगरसचिव पदासाठी पुन्हा एकदा जाहिरात काढली जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT