Pune Municipal Hospital Medicine
Pune Municipal Hospital Medicine Sakal
पुणे

Pune News : पुणे पालिकेत औषधांचा खडखडाट; रुग्णांचे प्रचंड हाल

सकाळ वृत्तसेवा

पुणे महापालिकेतर्फे गरीब रुग्णांना मोफत औषधे दिली जातात, पण आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे महापालिकेच्या औषधालयात खडखडाट झाला आहे.

पुणे - पुणे महापालिकेतर्फे गरीब रुग्णांना मोफत औषधे दिली जातात, पण आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे महापालिकेच्या औषधालयात खडखडाट झाला आहे. नव्याने औषध खरेदीसाठी निधीच शिल्लक नसल्याने साडेपाच कोटी रुपयांचे वर्गीकरण केले आहे. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान १५ दिवसांचा कालावधी लागणार असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.

काय आहे योजना?

  • गरीब नागरिकांसाठी शहरी गरीब योजना

  • या योजनेत एक लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्यांना दोन लाखांपर्यंत मोफत उपचार

  • महापालिकेचे कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजना

  • दरवर्षाला २० हजार कार्डधारक आणि त्यावर कुटुंबातील पाच सदस्य असे एक लाख नागरिकांना याचा फायदा होतो.

माझी मुलगी जन्मजात अपंग आहे. तिला दर महिन्याला मोठ्या प्रमाणात औषधे लागतात. महापालिकेच्या शहरी-गरीब योजनेतून ही औषधे आम्हाला मिळतात. या योजनेत मध्येच खंड पडू नये, यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी.

- अमोल सर्जेराव, नागरिक

रुग्णांना पाठविले माघारी

गेल्या १५ दिवसांपासून गाडीखाना येथील औषध भांडारातील औषधे संपली आहेत, असे सांगून रुग्णांना माघारी पाठवले जात आहे. त्यामुळे नाइलाजास्तव खासगी दुकानातून औषधे खरेदी करण्याची नामुष्की रुग्णांवर आली आहे.

शहरी-गरीब योजनेतील रुग्णांना मोफत औषधे देण्यासाठी सहा कोटी रुपयांचा निधी होता, तो संपल्याने नव्याने साडेपाच कोटी रुपयांचा निधी वर्गीकरणाद्वारे मिळाला आहे. १५ दिवसात औषधे उपलब्ध होतील. वर्गीकरणाची प्रक्रिया लवकर सुरू केली होती, पण विविध मान्यता घेण्यास विलंब लागला आहे.

- डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, महापालिका

गरिबांसाठी असलेल्या योजनेचा निधी वाढविण्याऐवजी त्यात ४० टक्के कपात केली आहे. हा निधी कमी का केला?, याचे उत्तर आयुक्तांनी द्यावे.

- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

  • १५ हजार कार्डधारक - ऑक्टोबरअखेर औषधे घेतलेले

  • ७५ हजार नागरिक - एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ मध्ये औषधे घेतलेले

महापालिकेचा ढिसाळ कारभार

पुणे महापालिकेतर्फे गरीब रुग्णांना औषधे मोफत दिली जातात. पण, औषधालयात खडखडाट झाला आहे.त्यामुळे खासगी दुकानातून औषधे खरेदीची नामुष्की रुग्णांवर आली आहे. याबाबत आपल्या सूचना नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

मोफत औषधांसाठी निधी

२०२०-२१ - १३ कोटी रुपये

२०२१ -२२ - १० कोटी रुपये

२०२२-२३ - ६ कोटी रुपये

  • १५,००० - शहरी गरीब कार्डधारक

  • ७५,००० - लाभार्थी संख्या

  • २५,००० - अंशदायी कार्डधारक

  • १,२५,००० - लाभार्थी संख्या

  • ५२ - महापालिकेचे दवाखाने

  • १०,००० - दररोजची ओपीडी

  • १९ - प्रसूतिगृहे

  • २ - रुग्णालये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील फास्ट फूडची दुकाने आगीत जळाली

SCROLL FOR NEXT