Water-Saving
Water-Saving 
पुणे

पुणे पालिकेला पाणीबचतीची जाग

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरात पाणीकपात लागू करताच महापालिकेने पाणीबचतीच्या उपायांकडे लक्ष देण्यास सुरवात केली असून, व्यावसायिक कारणांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय आता महापालिकेने घेतला आहे. 

महापालिकेकडून आता बांधकामे, जलतरण तलाव, वॉशिंग सेंटर, उद्याने अन्य व्यावसायिक ठिकाणांची पाहणी करण्यात येणार आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा वापर होतो की नाही, हे तपासण्यात येणार आहे. त्याकरिता विशेष पथके नेमली जाणार आहेत. याशिवाय नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची खातरजमा करून कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. शहराच्या पाणीसाठ्यात कपात झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून रोज एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात सर्व भागातील रहिवाशांना समान आणि पुरेसे पाणी मिळावे, यासाठी सर्वत्र सलग पाच तास पाणी सोडण्यात येत आहे. 

पाणीबचतीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गेल्या आठवड्यात स्पष्ट केले होते. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने कार्यवाही केली आहे. याबाबत संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT