road sakal
पुणे

महंमदवाडीतील रस्ते पालिका कधी दुरुस्त करणार

वाहनचालकांची कसरत खड्ड्यांमुळे वाहनांचे होते मोठे नुकसान

अशोक बालगुडे

उंड्री : महंमदवाडी-डी मार्ट, कोरिएंथन क्लब, वेताळबाबा मंदिर, रहेजा चौक, डी मार्ट परिसरातील खड्डेमय रस्त्यात दुचाकी खड्ड्यात कोलमडून अपघात होत आहेत. पालिका प्रशासन रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी मुहूर्त शोधत आहे का, असा संतप्त सवाल वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

पावसामुळे पडलेल्या खड्डेमय रस्त्यातून वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांत वाहने आदळल्याने वाहनांचे नुकसान होत आहे, तर कंबर, पाठ आणि मणक्याचा त्रास होत असल्याचे चालक, सहप्रवाशांनी सांगितले. पीएमपी बस खड्ड्यात आदळताच चाकरमानी, शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांची तारांबळ उडत आहे. आता पावसाने उघडीप दिली आहे, त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवावेत, अशी मागणी महंदवाडीतील बाळा घुले, दिलीप राठोड, ओंकार तिवारी यांनी केली.

गृ़हिणी पूनम देशपांडे, अनसुया गुप्ता म्हणाल्या की, पावसाची रिपरिप, खड्डे-चिखलमय रस्त्याने ये-जा करताना नको झाले आहे. वाहने खड्ड्यात गेली की, अंगावर पाणी उडते, चिखलमय रस्त्यावरून चालताना पाय घसरून अपघात होत आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडावे की नाही, अशी भयावह परिस्थिती झाल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता विक्रम लहाने म्हणाले की, पावसामुळे सर्वत्र खड्डेमय रस्ते झाले आहेत. त्याची दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT