Pune municipality will fill potholes with asphalt even in heavy rains Sakal
पुणे

खड्डा भरल्यावर २ मिनिटात ट्रॅफिक सुरू, पालिकेचा नवा प्रयोग रिअँक्टिव्ह

अस्फाल्टने पालिका भर पावसांतही खड्डे बुजवणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - रस्त्यावरील खड्डे आणि पावसाचे पाणी यांचे साप आणि मुंगुसासारखे नात आहे. गेल्या काही वर्षात सातत्याने खड्डे बुझवण्यासाठी नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेने आणखी एका तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरलवे आहे. भर पावसातही रिअँक्टिव्ह अस्फाल्ट टेक्नोलॉजीचा वापर डांबरी रस्त्यावर करण्यात येणार आहे. या टेक्नॉलॉजीमुळे धो धो पाऊसांतही काही मिनिटांत खड्डा बुजवणे शक्य होणार आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती पालिकेच्या रस्ते विभागाकडून देण्यात आली. महत्वाचे म्हणजे या पद्धतीने रस्ते बुझवण्यासाठी पालिका २ कोटी रूपये खर्च करणार आहे.

कोल्डमिक्स तंत्रज्ञानाने पावसाळ्यात खड्डे बुझवण्यासाठी येणाऱ्या मर्या पाहता पालिकेने यंदा खड्डे बुजवण्यासाठी जीओ पॉलिमर, एम ६००, पेव्हर ब्लॉक व रॅपिड हार्डिंग या चार तंत्रज्ञानाचा प्रयोग केला. आता रिअँक्टिव्ह टेक्नोलॉजीचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. हे तंत्रज्ञान धो धो पाऊस सुरु असताना आणि पावसाच्या विश्रांतीनंतर या टेक्नोलॉजीचा वापर करणे उपयुक्त ठरणार आहे. ज्या निविदाकाराचा प्रतिसाद मिळेल त्या कंपनीचा अनुभव लक्षात घेऊन कंत्राट दिले जाणार आहे. जोरदार पाऊस, खड्ड्यात पाणी भरले असताना रिअँक्टिव्ह टेक्नोलॉजीचा वापर करणे उपयुक्त ठरणार आहे. मात्र या नवीन टेक्नोलॉजीचा वापर फक्त डांबरी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी होणार आहे.

रिअँक्टिव्ह अस्फाल्ट टेक्नोलॉजीत केमिकल व डांबराचा वापर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या टेक्नोलॉजीमुळे वाहनांच्या टायरला रिअँक्टिव्ह अस्फाल्ट चिकटणार नाही. तसेच खड्डा बुजवल्यानंतर पुढील दोन मिनिटांत वाहने धावू शकणार आहेत. पाण्याच्या संपर्कात आल्यानंतरही खड्ड्यासाठी वापरण्यात आलेल्या अस्फाल्टवर कोणताही परिणाम होत नसल्याचे या तंत्रज्ञानाच्या वापरातून आढळले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: सूर्यकुमार - शुभमन गिलला सूर सापडला, पण पहिल्या T20I सामन्यावर पावसाचे पाणी, मॅच रद्द

Latest Marathi News Live Update : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भाजपचे शक्तिप्रदर्शन !

तिच्याशिवाय पर्याय नाही! दिग्दर्शकासोबत भांडली, तडकाफडकी मालिका सोडली; आता त्याच शोमध्ये परतणार अभिनेत्री

Mumbai Traffic: मुंबईकरांनो आनंदाची बातमी! जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड सुस्साट होणार, मार्गावरील मोठा अडथळा पालिकेने दूर केला

IND vs AUS 1st T20I: ओव्हर्स कमी होण्यामागे पाऊस नव्हे, तर भलतंच कारण! तुम्हाला कळलं तर म्हणाल, आमच्या इथे असं कधी होत नाही...

SCROLL FOR NEXT