Waraje 
पुणे

पुणे : वारज्यात पोलीस उपनिरीक्षकाच्या आईचा खून

वारज्यात वृद्ध महिलेचा डोक्यात लोखंडी सळई घालून खुन; चार दिवसात 6 खुन

सकाळ वृत्तसेवा

वारजे (पुणे) : अनोळखी व्यक्तीने वृद्ध महिलेच्या डोक्यात लोखंडी सळई घालून तिचा खुन(Murder) केला. हि घटना शनिवारी पहाटे वारजे येथील मंडई परिसरात उघड़कीस आली. मृत महिला हि एका पोलिस उपनिरीक्षकाची Police) आई आहे. (Pune Murder of police sub-inspector mother in Warje)

शाबाई अरुण शेलार ( वय 65, रा. रामनगर, वारजे ) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाबाई शेलार या वारजे येथील रामनगर परिसरात राहतात. त्यांचा मुलगा विठ्ठल शेलार हे 7-8 वर्षापूर्वी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. सध्या ते सातारा पोलिस दलात सहायक पोलिस निरीक्षक म्हणून काम पाहात आहेत.

शाबाई शेलार यांची पोलिस अधिकाणाऱ्याची आई अशी ओळख होती.मग त्यांचा खून कुणी व कशासाठी केला. याचा वारजे पोलीस तपास करत आहे. दरम्यान, शनिवारी पहाटे वारजे येथील मंडई परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह पडल्याची खबर पोलिसांना मिळाली. पोलिस घटनास्थळी पोचले, त्यावेळी महिलेच्या डोक्यात डोक्यात लोखंडी सळई घालून खुन करण्यात आल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविला. (Pune Murder of police sub-inspector mother in Warje)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Munde Case: ''वाल्मिक कराडच्या बंगल्यातून अजूनही सूत्र हलतात, धनंजय मुंडेंचा संबंध नाही'', ज्ञानेश्वरी मुंडेंनी स्पष्ट सांगून टाकलं

रोहित शर्मा, राहुल द्रविड यांच्या शैलीचं क्रिकेट T20 World Cup 2026 मध्ये चालणार नव्हते... सूर्यकुमार यादवचे स्पष्ट मत

Stock Market Today: शेअर बाजार लाल रंगात बंद! मोठी घसरण झाली तरी हे स्टॉक मात्र वाढले

इराण-इस्रायल तणावात सोन्याच्या किमती घसरल्या; खरेदीसाठी हीच योग्य वेळ आहे का? तज्ञांनी उत्तर देत गुंतवणूकदारांचा प्रश्नच सोडवला!

काही महिने सोबत राहिले पण... हंसिका मोटवानीचा घटस्फोट कशामुळे झाला? खरं कारण समोर

SCROLL FOR NEXT