Pune Crime News esakal
पुणे

Pune Crime News: नायलॉनच्या दोरीने गळा आवळून तरुणाचा खून

आर्थिक व्यवहारातून झालेल्या भांडणात एकाने तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारुन नायलॉन दोरीने गळा आवळून खून केला.

सकाळ वृत्तसेवा

आर्थिक व्यवहारातून झालेल्या भांडणात एकाने तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारुन नायलॉन दोरीने गळा आवळून खून केला.

पुणे - आर्थिक व्यवहारातून झालेल्या भांडणात एकाने तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारुन नायलॉन दोरीने गळा आवळून खून केला. ही घटना आंबेगाव बुद्रूक येथे शुक्रवारी पहाटे अडीचच्या सुमारास घडली.

राहुल बबन दांगट (वय ४६, रा. सिलाई वर्ल्डसमोर, आंबेगाव बुद्रूक) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मृत व्यक्तीचा भाऊ विकास बबन दांगट (वय ४२, रा. आंबेगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यावरून भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक केली आहे. सुशांत नारायण आरुडे (वय ३०, रा. चिंतामणी अपार्टमेंट, फालेनगर, आंबेगाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत आरुडे व राहुल दांगट हे एकमेकांचे मित्र होते. ते आरुडे याच्या घरी पहाटेपर्यंत मोबाईलवर चित्रपट पहात होते. त्यावेळी त्यांच्यात आर्थिक व्यवहारावरून वाद झाला.

स्थानिक नागरिकाने ही बाब पोलिस नियंत्रण कक्षाला कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु तोपर्यंत आरुडे याने राहुल यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून नायलॉनच्या दोरीने गळा आवळला होता. आरुडे हा पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi press conference: राहुल गांधींनी दाखवले पोलिसांच्या क्रूरतेचे धक्कादायक फोटो; अमित शाहांचं नाव घेत केला गंभीर आरोप

Live Marathi News Update : केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांना पत्र लिहिले

Pune Investment Scam: शेअर मार्केट व ऑनलाइन टास्कच्या आमिषाला चौघे बळी; पुण्यात ४६ लाखांची सायबर फसवणूक

Pune Gurupurnima Celebration: पुण्यात गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्सव; मंदिरांपासून शैक्षणिक संस्थांपर्यंत गुरु-शिष्य परंपरेचा सन्मान

Vaibhav Sooryavanshi कडे थेट उपकर्णधारपदाची जबाबदारी! BCCI च्या प्रमुख स्पर्धेत ईशान किशनच्या नेतृत्वात खेळणार

SCROLL FOR NEXT