pune sakal
पुणे

Pune:संगीत चांगल्या आरोग्यासाठी लाभदायक - डॉ.संतोष बोराडे

नवी सांगवीतील जिवन संगीत कार्यक्रमाचा सांगवी पिंपळे गुरवकरांनी घेतला आनंद

रमेश मोरे

जुनी सांगवी - आरोग्य चांगले राहावे यासाठी संगीत लाभदायक आहे.मात्र संगीत म्हणजे नुसतं गाणं ऐकणं नव्हे,किंवा हल्लीचा वाजणा-या डीजेवरचा नाच नसून भारतीय संस्कृतीतील सण, वार अध्यात्म ,भजन संगीत उत्सवामागील परंपरागत खेळ, त्यातील गाणी व त्यातून होणारा व्यायाम होय असे नवी सांगवी येथील जिवन संगीत कार्यक्रमात डॉ.संतोष बोराडे यांनी सांगितले.

स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप, स्वर्गीय लौकिक माटे यांच्या स्मरणार्थ माटे ॲन्ड सन्स सोशल फाउंडेशन व सांगवी पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने "जीवन संगीत'; संगीत, आनंद, आरोग्य, अध्यात्म या विषयावर आधारित कार्यक्रमाचे नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून करण्यात आली. प्रास्ताविक सांगवी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी केले.टोणपे म्हणाले, माटे सोशल फाउंडेशनचे सामाजिक कार्य मोठे आहे.

कोविड काळात फाउंडेशनच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून योगदान दिले आहे. कार्यक्रमास भाजपा चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप,विजय लांडे,राजु मिसाळ,महेश रमेश माटे

डॉ. पि. एल. खंडागळे, संदीप श्रीपाद बेलसरे,सखाराम रेडेकर, राजेंद्र राजापुरे,मनीष शिवाजीराव पंडित, सांगवी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे,आयोजक ओंकार महेश माटे आदी उपस्थित होते.

डॉ.संतोष बोराडे म्हणाले, भारतीय संस्कृतीतील पारंपारिक खेळ त्यासोबत जोडलेली गाणी यामधून होणारा व्यायाम व एकाग्रता आरोग्यासाठी लाभदायक ठरायची.

मग ते जात्यावरिल गाणे असो ओवी असो की,सण उत्सवात खेळणारी झिम्मा फुगडी असो या खेळांमधील गाणी व होणारा व्यायाम मानसिक ताण दुर करत पुर्वीच्या लोकांना आजारांपासून दूर ठेवायचा.अध्यात्म, संगीत, योग्य आहार व व्यायाम या गोष्टी सर्वांनी आचरणात आणणे गरजेचे आहे.

शंकर जगताप म्हणाले, चांगल्या निरामय आरोग्यासाठी संगीत चांगले काम करते‌.येणा-या दिवाळी पहाट कार्यक्रमांमधून आमच्या परिसरात जिवन संगीत कार्यक्रम आवर्जून सुरू केला जाईल.

पिंपळे गुरव,जुनी सांगवी,नवी सांगवी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत या कार्यक्रमाचा आनंद घेतला.डॉ.संतोष बोराडे व सहका-यांनी सादर केलेली गाणी,विनोदी चुटकुले,व गप्पांना रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमाचे आयोजक ओंकार महेश माटे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू, बंगालमध्ये पहिल्याच कलात भाजपला धक्का, TMC सुसाट

Great Nicobar Project: ‘ग्रेट निकोबार’वर हवी संसदेत चर्चा: काँग्रेसची मागणी, राहुल गांधींच्या प्रश्‍नांमुळे सरकार घाबरल्याचा दावा, काय आहे प्रकल्प?

Sunetra Pawar Baramati Bypoll : अजितदादांच्यानंतर सुनेत्राताईंची जबाबदारी! अजित पवारांचे आतापर्यंतचा विक्रम सुनेत्रा पवार मोडणार, “मॅजिक फिगर” गाठणार

Nagpur Crime : नायब तहसीलदाराने जीवन संपवले, राहत्या घरी घेतला गळफास, धक्कादायक कारण समोर

Kolhapur crime news : डॉक्टर महिला घरात एकटी, ओळखीच्या तरूणाकडून बलात्कार; मोबाईलवर शूट करून दिली धमकी, कोल्हापुरात धक्कादायक घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT