मैलामिश्रीत पाणी उघड्यावर
मैलामिश्रीत पाणी उघड्यावर Sakal
पुणे

मैलामिश्रीत पाणी दारात; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

मोहिनी मोहिते

कॅन्टोन्मेंट : नाना पेठेतील अतिक्रमण करून बांधलेल्या इमारतीचे ड्रेनेज चुकीच्या पद्धतीने जोडल्याने एसआरए स्कीमचे चेंबर तुंबत आहे. मैलामिश्रीत पाणी उघड्यावर वाहत असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलनकेले जाईल, असा इशारा स्व. ताराबाई तुळशीराम तांबे ट्रस्टचे सचिव पांडुरंग कांबळे यांनी दिला आहे.

नाना पेठेतील स.नं. १०४१ मध्ये झोपडपटटीवासीयांच्या पुनर्वसनासाठी बांधलेल्या एस.आर.ए. स्किमचे विकासक आसिफ शेख (गोल्डन कन्ट्रक्शन) यांनी स्व. ताराबाई तुळशीराम तांबे सांस्कृतिक भवनाच्या जागेमध्ये अतिक्रमण करून बांधलेल्या इमारतीतील ड्रेनेज घातक पध्दतीने जुन्या ड्रेनेजशी जोडले आहे. त्यामुळे चेंबर सदोदित तुंबत असल्याने त्यातून दुर्गंधीमय व मलमुत्राचे पाणी सर्व परिसरामध्ये फैलावते.

त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. येथील नागरिकांना पटकी, अमांश, हिवतापासारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. महानगरपालिका आयुक्त व आरोग्य प्रमुख यांच्याशी त्याचप्रमाणे क्षेत्रीय कार्यालय ढोले पाटील क्षेत्रीय अधिकारी यांच्याशी स्वतः भेटून सदर तकारी केली. त्यावेळी जबाबदार अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर तुमच्या तक्रारींचे निवारण केले जाईल असे आश्वासन दिले. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई केली नाही, अशी तक्रार येथील नागरिकांनी केली.

यावेळी ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक निखिल शेंडगे म्हणाले की आमच्याकडे अजून या समस्येची तक्रार आली नाही तरी देखील जागेची पाहणी करून त्वरित काम करून घेण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT