Narhe Petrol Pump Robbery 
पुणे

पुणे : नऱ्हे भागात सोमवारी मध्यरात्री पेट्रोल पंपावर दरोडा

सुरक्षा रक्षकाला कुऱ्हाडीने मारहाण करून रोकड लुटली

विठ्ठल तांबे

पुणे : मध्यरात्री नऱ्हे येथील पेट्रोल पंपावर दरोडा, तीन जखमी, वीस हजार चारशे रुपयांची रोकड लंपास,दरोड्यांची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद..

धायरी नऱ्हे येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आला. यावेळी झालेल्या मारहाणीत तीन जखमी झाले. वीस हजार चारशे रुपयांची रोकड लुट करण्यात आली. मध्यरात्री पेट्रोल पंपावर दरोडा पडला. सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली.

सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.सोमवारी  दि. 23 रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास  दोन अनोळखी इसम हातात कुऱ्हाड घेऊन यातील फिर्यादी कामास असलेल्या भूमकर चौक येथील व्ही. के .डी  पेट्रोलपंप येथे येऊन कुऱ्हाडीच्या उलट्या बाजूने  यातील शांतकुमार पाटील यांस डोक्याला व नाकाला व प्रसाद शेंडकर यांच्या डावे कानाचे वर डोक्याला कुऱ्हाडीच्या उलट्या बाजूने मारून गंभीर जखमी केले. तसेच अविनाश जमादार यांच्या खांद्यावर आणि हातावर मारून किरकोळ दुखापत केली. फिर्यादी यांना मारायचा धाक दाखवून त्यांचेकडून २०४०० एवढी रोख रक्कम जबरीने चोरून नेली आहे . मारहाण झालेल्याना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

● जखमी -

1. शांतकुमार पाटील

2. अविनाश जमादार

3. प्रशांत शेंडकर

●तपास -

1. घटनास्थळीचे cctv फुटेज घेतले आहे.

2. घटनस्थळाचे आजूबाजूचे cctv पाहणे चालू आहे.

3. घटनास्थळ वरील डंप डेटा काढणे चालू आहे.

घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहाणी करून अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी सिंहगड रस्ता पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे, प्रमोद वाघमारे व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे.

"पोलिसांनी घटनास्थळीचे cctv फुटेज घेतले आहे.घटनस्थळाचे आजूबाजूचे cctv पाहणे सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संख्ये यांनी सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT