pune sakal
पुणे

पुणे-नाशिक हायस्पिड रेल्वेला शेतकऱ्यांचा विरोध

जिल्ह्यातून ही रेल्वे जात आहे, शेतक-याचे शेती हे एकच उपजीविकेचे साधन असुन बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक असुन या ठिकाणाहून जात असलेल्या रेल्वेला शेतकऱ्यांच्या मोठया प्रमाणात जमिनी जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

आळेफाटा : नाशिक हायस्पिड रेल्वे जुन्नर, आंबेगाव, खेड ,हवेली या तालुक्यातून जात असुन या रेल्वेला तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असुन या संदर्भाचे निवेदन आज दिल्ली या ठिकाणी जाऊन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांणा पुणे जिल्हा रेल्वे कृती समीतीचे अध्यक्ष निलेश भुजबळ तसेच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान संचालक भाऊदादा कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन दिले. यावेळी ठाणे जिल्हा सहकारी बोर्ड अध्यक्ष ज्ञानेश्वर डुंबरे, रेल्वे विरोध शेतकरी संघर्ष कृती समितीचे अजित सहाणे, शरद गाढवे, संतोष पाडेकर,गेनभाऊ हुलावळे, वसंत कुऱ्हाडे, अशोक गाढवे आदी पदाथिकारी व शेतकरी उपस्थित होते. (Pune News)

दरम्यान रेल्वे राज्यमंत्री यांणा दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पुणे जिल्ह्यातील ज्या तालुक्यामधुन ही रेल्वे जात आहे त्या शेतक-याचे शेती हे एकच उपजीविकेचे साधन असुन बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक असुन या ठिकाणाहून जात असलेल्या रेल्वेला शेतकऱ्यांच्या मोठया प्रमाणात जमिनी जात आहे.

तसेच संपादन केलेल्या जमीणी व्यतिरिक्त उर्वरीत जमीन ही शेतीयोग्य राहत नसल्याने छोटे शेतकरी (अल्पभूधारक) यांचे नुकसान होणार आहे. त्याचप्रमाणे या रेल्वे भूसंपादनात अनेक विहीरी,बोअरवेल, शेती तळे ,राहती घरे,जनावरांचे गोठे,रस्ते,पाण्याच्या चा-या जात असल्याने शेतक-यांणा या अडचणींना समोर जावे लागणार आहे.

तसेच या अगोदर जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी या पिंपळगाव जोगे पाटबंधरे,चिल्हेवाडी, पालघर, विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील व पुणे नाशिक महामार्गासाठी जमिनी गेल्या आहेत आणी आता परत या जाणाऱ्या रेल्वे प्रकल्पात जमीणी जात असल्याने या हायस्पीड रेल्वेला आम्हा शेतकऱ्यांचा विरोध असुन हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गावरून विधानसभेत खडाजंगी! विरोध झुगारून सरकार प्रकल्प पुढे रेटणार? MSRDC च्या हालचालींना वेग, काय म्हणाले मंत्री शिवेंद्रराजे?

Mumbai Local: 'चार मर्डर केलेत, आता तुझा नंबर', लोकलमध्ये मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा, जीवे मारण्याची धमकी; VIDEO VIRAL

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT