Lende Family Sakal
पुणे

पुणे नाशिक महामार्गावर अपघात: पती, पत्नीसह मुलाचा दुर्दैवी मृत्यू

मोटारकारची मागून धडक बसून झालेल्या अपघातात भटकळवाडी (ता. जुन्नर) येथील पती, पत्नीसह त्यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू.

सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव - येथील पुणे नाशिक महामार्गावर (Pune Nashik Highway) जांबुत फाटा येथे दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारकारची (Motorcar) मागून धडक बसून झालेल्या अपघातात (Accident) भटकळवाडी (ता. जुन्नर) येथील पती, पत्नीसह त्यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. ही घटना आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झाला. (Pune Nashik Highway Three Death in Accident)

अपघातात राजेश निवृत्ती लेंडे (वय ३०), त्यांची पत्नी सुरेखा (वय २७), मुलगा यश यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मोटारकार चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

पुतणीचा विवाह असल्याने राजेश लेंडे हे पत्नी सुरेखा व मुलगा यश यांना नारायणगाव येथे कपडे खरेदीसाठी घेऊन गेले होते. परत येत असताना पुणे नाशिक महामार्गावर जांबुत फाटा येथे त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारीने (एमएच १४ जीएच २२०६) मागून धडक दिली. अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे भटकळवाडी गावावर शोककळा कोसळली. अपघात नंतर मोटार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन पलटी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT