295 ways for wildlife on samruddhi highway nagpur news 
पुणे

Junnar: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग वन्यप्राण्यांसाठी ठरतोय मृत्यूचा सापळा! बिबट्यांसाठी भुयारी मार्ग तयार करण्याची मागणी

डी.के वळसे पाटील

Maharashtra - पुणे -नाशिक राष्ट्रीय महामार्ग तयार करताना वन्यप्राण्यांची सुरक्षितता व मुक्तसंचार याबाबत कुठलाही विचार करण्यात आलेला नाही. खेड घाट, पेठ अवसरी घाट, तांबडेमळा, शेवाळवाडी, निघोटवाडी, मंचर, कळंब – एकलहरे, नारायणगाव बाह्यवळण या भागात वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत वाहनांच्या धडकेत दहा बिबटे तसेच इतर ही वन्यजीव मृत्युमुखी पडलेले आहेत. यापुढे बिबट्यासह अन्य वन्यप्राण्यांना महामार्ग ओलांडण्यासाठी वनखात्याच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महामार्ग विभागाने आवश्यक त्या उपाययोजना हाती घ्याव्यात.”अशी मागणी वन्यजीव संरक्षण, पर्यावरण प्रेमीं संस्था व तज्ञांनी केली आहे.

खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यात महामार्गावर अनेक ठिकाणी जंगल आहेत. या भागात बिबट्यांची संख्या अधिक असून दिवसा व रात्री बिबटे व अन्य वन्य प्राण्यांचा वावर वाढलेला आहे. रस्त्यांचे रुंदीकरण करताना वन्य प्राण्यांना रस्ता ओलांडताना योग्य उपयोजना न केल्यामुळेच या महामार्गावर अपघातात वन्य प्राण्यांचा जीव गेल्याच्या व गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडत आहेत.

“प्राणी पक्षी यांचे प्रजनन होते. ते अन्न - पाण्याच्या शोधात भटकंती करतात. वन्यजीव रस्त्यावर येऊ नये तसेच वन्य प्राण्यांना मुक्त संचार करता यावा.यासाठी भुयारी मार्ग व इतर विशेष व्यवस्था करणे गरजेचे होते. परंतु अशी कुठलीही व्यवस्था केलेली दिसत नाही. केवळ वाईल्ड लाईफ क्रॉसिंग एवढेच फलक काही ठिकाणी लावलेले दिसतात. वन्य प्राणी यांच्या भुयारी मार्ग मागणीचा पाठपुरावा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पर्यावरण प्रेमी ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेच्या माध्यमातून करणार आहे.”अशी माहिती पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक अभियंता दिलीप मेदगे यांनी दिली.

“आंबेगाव तालुका ते नारायणगाव पर्यंत पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रस्ता ओलांडत असताना गेल्या तीन वर्षात एकूण १७ वन्य प्राण्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यामध्ये दहा बिबटे, तरस, कोल्हे, सांबर अश्या प्राण्यांचा समावेश आहे. रस्ता ओलांडण्यासाठी व भविष्यात वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय महामार्गावर आवश्यक त्या उपाययोजना तातडीने हाती घेण्याची गरज आहे.”

स्मिता राजहंस, वन परिक्षेत्र अधिकारी, मंचर

“पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे चौपदरीकरण करतांना वन्यजीवांना रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग निर्माण करावेत असे सन २०१४,२०१५ मध्ये केंद्रीय वन व पर्यावरण विभागाने राज्याला कळविले होते. याबाबत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण पश्चिम विभागीय खंडपीठ, पुणे यांच्यासमोर याचिका दाखल केली होती. त्यानुसार संगमनेर तालुक्यात चार ते पाच भुयारी मार्ग निर्माण होणार आहेत. पण खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात अद्याप कार्यवाही झालेली नाही. राष्ट्रीय वन्यजीव संस्थेच्या निकषानुसार भुयारी मार्ग निर्माण करून वन्यजीवांचा जीव वाचवला पाहिजे.”

गणेश बोऱ्हाडे,याचिककर्ता, संगमनेर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डिनोने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा ‘मोरया’ झाला असता, एकनाथ शिंदे सभागृहात संतापले! विरोधकांचेही टोमणे

"कुर्ला टू वेंगुर्ला"मधून उलगडणार 'एका लग्नाची गोष्ट'; मुख्य भूमिकेत दिसणार 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेता

Latest Marathi News Updates : अमरावतीमध्ये आरोग्य परिचारिकांचे एक दिवसीय काम बंद आंदोलन

farmer Success Story :'दोडक्याने दाखवली कर्जमुक्तीची वाट'; जैविक शेतीचा यशस्वी प्रयोग, उत्पादन खर्चात झाली बचत

Hinjewadi Connectivity: ‘आयटी’ला मिळणार जलद ‘कनेक्टिव्हिटी’; रस्ता रुंदीकरणाचा फायदा

SCROLL FOR NEXT