पुणे

#PuneNashikRailway पुणे-नाशिक रेल्वे अवघ्या दोन तासांत ! 

मंगेश कोळपकर

पुणे  - पुणे-नाशिक लोहमार्गावर पारंपरिक रेल्वेचा आराखडा तयार झाला असला, तरी या मार्गावर स्पीड रेल्वे सुरू करता येईल का?, यासाठी पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनीने (एमआरआयडीएल) सुरवात केली आहे. त्यानुसार प्रकल्प सुरू झाल्यास प्रवाशांना अवघ्या दोन तासांत पुण्याहून नाशिकला जाता येईल. 

पुणे-नाशिक लोहमार्गाचा प्रकल्प अनेक वर्षे चर्चेत आहे. हा मार्ग प्रत्यक्षात यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने राज्य सरकारसमवेत करार करून "एमआरआयडीएल' कंपनी स्थापन केली आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारने प्रत्येकी 50 कोटी रुपयांचे भागभांडवलही उपलब्ध करून दिले आहे. या पूर्वीच्या आराखड्यानुसार, पुणे-नाशिक हा 214 किलोमीटरचा रेल्वे मार्ग साकारण्यासाठी सुमारे 5341 कोटी रुपये खर्च येणार होता. त्यासाठी पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यांतून सुमारे 1250 हेक्‍टरचे भूसंपादन करावे लागणार होते. परंतु हा प्रकल्प साकारण्यासाठी उर्वरित निधी उभारण्याबाबत मर्यादा येत होत्या. ते लक्षात घेऊन या मार्गावर दुहेरी "स्पीड ट्रेन' सुरू करता येईल का, याबाबत चाचपणी करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार "एमआरआयडीएल' कंपनीने निविदा काढून पाहणीचे काम 15 दिवसांपूर्वी सुरू केले आहे. दोन-तीन महिन्यांत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर त्याचा प्रकल्प आराखडा रेल्वे बोर्डामार्फत केंद्र सरकारच्या नीती आयोगाला सादर होणार आहे. 

- असे जाता येणार - पुणे, तळेगाव, चाकण किंवा हडपसर, वाघोली चाकण मार्गे प्रवाशांना पुण्याहून नाशिकला जाता येणार 
- प्रकल्पाचा खर्च - सुमारे सात हजार कोटी रुपये 
- उपयोग - मालवाहतुकीसाठी सोईस्कर 
- अंतर - पुणे ते नाशिक- 214 किलोमीटर 
- भूसंपादन - पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यांतून सुमारे 1250 हेक्‍टर 

एमआरआयडीएल कंपनी पुण्यातही? 
पुणे-नाशिक मार्गासाठी रेल्वे प्रशासन व राज्य सरकारने स्थापन केलेल्या कंपनीचे कार्यालय सध्या मुंबईत आहे. पुण्यातही त्याची शाखा असावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या 15 दिवसांत त्यासाठी पाहणी होणार आहे. त्यानंतर कंपनीच्या पुण्यातील कार्यालयाची जागा निश्‍चित होईल, असे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले. 

पुणे-नाशिक लोहमार्गासाठी आता स्वतंत्र कंपनी स्थापन झाली आहे. त्यात रेल्वे आणि राज्य सरकारच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. लोहमार्गावर पारंपरिक रेल्वे चालविण्याऐवजी आता स्पीड ट्रेनबाबतचा प्रस्ताव पुढे आला आहे. सर्वच प्रशासकीय यंत्रणा त्याबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळे पुण्याहून नाशिकला दोन तासांत जाणे शक्‍य होईल. 
- शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार 

पुणे-नाशिक रेल्वेचा सर्वाधिक फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. सध्या पुण्याहून नाशिकला एसटी बसने जाण्यासाठी पाच ते सहा तास लागतात. मात्र, रेल्वेमुळे वेळेसह पैशांचीही बचत होणार आहे. त्याचप्रमाणे सकाळी घरी जाऊन पुन्हा संध्याकाळी पुण्यात येता येणे सहज शक्‍य होणार आहे. 
- प्रशांत देशमुख, विद्यार्थी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

Jalna News : पाणी आणण्यासाठी डाव्या कालव्यावर गेलेल्या ऊसतोड मजुराच्या मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यु; तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

Mumbai Local: पैसे कट झाले, तिकीट नाही! मुंबई लोकलची ‘सरल’ सेवा प्रवाशांच्या मदतीला, कसे कामी येणार?

Inspirational : Glenn Phillips ची पायलट बनण्यामागची कहाणी; ८ महिने क्रिकेटपासून दूर, पण पठ्ठ्याला स्वस्थ कुठे बसवत होतं...

SCROLL FOR NEXT