Pune Traffic sakal
पुणे

Pune Traffic : चाकणच्या पुणे -नाशिक महामार्गावरील वाहतुक कोंडीला जबाबदार कोण ?

पुणे- नाशिक महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होते. भामा नदीजवळ बिरदवडी फाट्याजवळ मोठया प्रमाणात पुणे- नाशिक महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होते. यामुळे नागरिक, कामगार, उद्योजक, विद्यार्थी,कंपन्यातील अधिकारी मोठा संताप व्यक्त करत आहेत.त्यात लग्न हंगामाची ही मोठी गर्दी आहे.

हरिदास कड - सकाळ वृत्तसेवा

चाकण : पुणे- नाशिक महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होते. भामा नदीजवळ बिरदवडी फाट्याजवळ मोठया प्रमाणात पुणे- नाशिक महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होते. यामुळे नागरिक, कामगार, उद्योजक, विद्यार्थी,कंपन्यातील अधिकारी मोठा संताप व्यक्त करत आहेत.त्यात लग्न हंगामाची ही मोठी गर्दी आहे. भीमा नदीवरील पुलाजवळ बिरदवडी फाट्याजवळ हातगाडीवर फळे विक्रेते मोठ्या प्रमाणात आहेत तेथे फळे घेणारे मोठ्या प्रमाणात थांबतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो.तेथे महामार्गावर मोठ्या प्रमाणात स्पीड ब्रेकर टाकल्यामुळे वाहने संथ होतात आणि वाहतूक कोंडी होते. निवडणुका येतात आणि जातात, पण वाहतूक कोंडीला जबाबदार कोण? वाहतूक कोंडी का सुटत नाही, निवडणुकांचे करायचे काय असा सवाल नागरिक,कामगार,विद्यार्थी, शेतकरी यांचा आहे.

चाकण, ता.खेड येथे पुणे- नाशिक महामार्गावर चाकण तळेगाव चौक,आंबेठाण चौक,मेदनकरवाडी,नाणेकरवाडी, खराबवाडी, महाळुंगे गावच्या हद्दीत तसेच भामा नदीवरील पुलाजवळ बिरदवडी फाट्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन सातत्याने वाहतूक कोंडी निर्माण होते.या मार्गावर वाहतूक कोंडी सातत्याने होत असल्याने वाहनांच्या रांगा अगदी दोन, तीन किलोमीटरवर लागत आहे. आळंदी फाटा ते चाकण अगदी दोन किलोमीटर अंतर पार करण्यासाठी एक ते दीड तास लागतो. तळेगाव चौक ते आंबेठाण चौक पार करण्यासाठी अगदी पाऊण तास लागतो. कामगार,शेतकरी,नागरिक, प्रवासी,विद्यार्थी, उद्योजक आदींचे हाल होत आहेत.पोलीस व संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे का त्यामुळे वाहतुक कोंडी होत आहे असाही आरोप होत आहे.

पुणे -नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीला तसेच पुणे -नाशिक महामार्गाच्या दुरावस्थेला जबाबदार कोण असा सवाल नागरिक,कामगार व्यक्त करत आहेत.गेल्या पंधरा वर्षापासून पुणे -नाशिक महामार्गाचे सहापदरीकरण होणार असे सांगितले जाते. परंतु या मार्गाचे काम काही होताना दिसत नाही. काही नेत्यांनी, मंत्र्यांनी आश्वासने दिली तरीही या महामार्गाचे काम काही सुरू होत नाही हे वास्तव आहे. या मार्गाच्या दुरावस्थेला कोण जबाबदार असे मत व्यक्त करून काही नेत्यांनाही नेटकरी जाणून-बुजून संताप व्यक्त करून सोशल मीडियावर कमेंट करतात. संबंधित अधिकाऱ्यांनी, नेत्यांनी यातून धडा घेणे गरजेचे आहे.

परंतु तो घेतला जात नाही. या मार्गाच्या दुरावस्थेमुळे सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे औद्योगिक वसाहतीतील कंपन्या गाशा गुंडाळतील का असे ही प्रश्न काही कामगार,उद्योजक यांना पडतो आहे. पुणे, मुंबई,नाशिक,मराठवाडा, नगर या भागांना जोडण्यासाठी हा पुणे -नाशिक महामार्ग महत्त्वाचा आहे त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची तसेच अवजड वाहनांची वर्दळ असते. अवजड वाहनांमध्ये कंटेनर, ट्रेलर,टँकर,बस आदी वाहने मोठ्या प्रमाणात धावतात. संबंधित विभाग, प्रशासन काहीच करत नाही. असा आरोप कामगार,नागरिकांचा आहे.

चाकण -शिक्रापूर, चाकण- तळेगाव मार्गावर पुणे - नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत कोणी पाऊल उचलताना दिसत नाही. पुणे -नाशिक महामार्ग सबंधित रस्ता केंद्राच्या अखत्यारीत येत असल्याने संबंधित मंत्र्यांनी, विभागाने लक्ष देण्याची गरज आहे असे नागरिक, कामगार, उद्योजक विजय बोत्रे, योगेश वाके, तुकाराम कांडगे, भरत कानपिळे, प्रकाश खराबी, चंद्रकांत परदेशी यांचे म्हणणे आहे.

केंद्रीय मंत्र्यांना निवेदने देऊन कंटाळले लोकं

पुणे -नाशिक महामार्गाचे नव्याने काम करण्यात यावे याबाबत केंद्रीय मंत्र्यांना पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी अनेक वेळा निवेदने दिलेली आहेत. या मार्गाचे काम लवकर होईल अशी आश्वासने अनेक वेळा दिलेली आहेत. परंतु या मार्गाचे काम काही होत नाही . निवेदने देऊन सुद्धा काम होत नाही याबद्दल नागरिकात,पदाधिकारी कार्यकर्त्यात तसेच उद्योजकात तीव्र नाराजी आहे. निवेदने देऊन लोक अक्षरशः कंटाळले आहेत असे उद्योजकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT