Prashant Jagtap sakal
पुणे

पुणे : मनसेच्या नाराज कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत यावं - प्रशांत जगताप

वसंत मोरे यांना देखील राष्ट्रवादीत येण्याचं खास निमंत्रण दिलं.

सकाळ डिजिटल टीम

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईत मांडलेले विचार मराठी मातीत तयार झालेल्या कार्यकर्त्याला न पटणारे आहेत. त्यामुळे मागील पाच -सहा दिवसांपासून मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.

खासकरुन पुण्यातल्या मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.पुण्यातल्या मनसेच्या नाराज कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये यावं, असं आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केल. वसंत मोरे यांचं राष्ट्रवादीत स्वागत आहे. त्यांचा सन्मान जपला जाईल,असं म्हणत त्यांनी वसंत मोरे यांना देखील राष्ट्रवादीत येण्याचं खास निमंत्रण दिलं.

जातिधर्माचे जोडे बाजूला ठेऊन ज्यांना देशाचा विकास करायचा आहे त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये यावं असं आवाहन प्रशांत जगताप यांनी केलंय. मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या मशिदीच्या भोंग्यासमोर हनुमान चालिसा वाचनाविषयी केलेल्या विधानावर वसंत मोरेंनी आपली वेगळी भूमिका मांडली होती. त्यानंतर वसंत मोरे यांची मनसेच्या शहराध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्यात आली. तसेच पुण्यातील नाराज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देखील दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT