pune
pune sakal
पुणे

Pune : मेडिकल प्रवेशासाठी आज ‘नीट’ परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘नीट’ परीक्षा रविवारी (ता. १२) घेण्यात येत आहे. देशभरातील १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. देशातील २०२ शहरांमध्ये रविवारी दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळात ही परीक्षा होणार आहे. पुण्यातून जवळपास वीस हजारांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

या परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा कागद, स्टेशनरी, पाणी, मोबाईल फोन, इअर फोन, कॅलक्युलेटर, इलेक्ट्रॉनिक घड्याळ, गॅझेट घेऊन जाऊ नये, असे एनटीएतर्फे सांगण्यात आले आहे.

यंदा इंग्रजी, हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, मल्याळम, कन्नड, तमीळ, तेलगू, उर्दू, पंजाबी यांसह १३ भाषांमध्ये या परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरतानाच प्रश्नपत्रिकेच्या भाषेचे माध्यम निवडले आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पुरविल्या जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्हापुरात PM मोदींच्या भाषणाला सुरूवात

Ujjwal Nikam: "माझा जन्म हनुमान जयंतीचा", 'मविआ' उमेदवाराला कसं रोखणार या प्रश्नावर निकमांचा थेट युक्तिवाद

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईला दुसरा धक्का! रोहितपाठोपाठ ईशान किशनही परतला माघारी

Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

SCROLL FOR NEXT