National Education Policy sakal
पुणे

Pune News: NEP च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यशाळा

नव्या शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठीची होणार चर्चा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (न्यू एज्युकेशन पॉलिसी - एनर्इपी) अंमलबजावणीत संभाव्य अडचणी काय असू शकतात. त्या लक्षात घेऊन त्यावर कोणते उपाय आहेत. एनर्इपीची प्रभावी अंमलबजावणी कशी करता येर्इल, यासह एनर्इपीबाबतच्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी स. प. महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

‘शिक्षण विकास प्रशासन केंद्र’ (सेडा), ‘शिक्षण प्रसारक मंडळीचे सर परशुरामभाऊ महाविद्यालय’ आणि ‘लोकमान्य टिळक शिक्षण शास्त्र महाविद्यालय’ यांच्या संयुक्त विद्यमाने हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. १३) सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच दरम्यान स.प. महाविद्यालयात ही कार्यशाळा पार पडेल.

कार्यशाळेत महाविद्यालयीन प्राचार्य तसेच शिक्षक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘सेडा’चे संचालक प्रा. अनिरुद्ध देशपांडे आणि शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन यांनी सोमवारी (ता. ९) पत्रकार परिषदेत दिली.

उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष केशव वझे, प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.सुनील गायकवाड, उपप्राचार्य डॉ. विद्या अवचट, उपप्राचार्य धनंजय दिवटे, विद्यालयातील एनर्इपीचे समन्वयक प्रा.डॉ.संज्योत आपटे, टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.राधिका इनामदार आणि आयक्यूएसी.

समन्वयक प्रा. डॉ. मनोजकुमार देवणे यावेळी उपस्थित होते. या कार्यशाळेत बहुविद्याशाखीय शिक्षण, अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट, परीक्षा पद्धतीत सुधारणा या विषयांवर चर्चा होणार आहे.

‘सेडा’च्या वतीने डॉ. सुलभा देऊस्कर, डॉ. दीपक पौडेल आणि प्रा. अनंत गोसावी हे अभ्यासक कार्यशाळेतील विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी करतील.

याशिवाय ‘रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठा’चे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर आणि ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’चे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्रकुलगुरू डॉ. संजीव सोनावणे हे विविध विषयांवर प्रकाश टाकतील. समारोपाच्या सत्रात राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळणकर मार्गदर्शन करतील.

आगामी शैक्षणिक वर्षात उच्च शिक्षण क्षेत्रात एनर्इपी कार्यरत होणार असून त्या अनुषंगाने अपेक्षित आणि अपरिहार्य अशा अनेक बदलांची नोंद घेऊन, त्यांचा सखोल अभ्यास होऊन त्याचे अधिकाधिक लाभ विद्यार्थ्यांना तसेच शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना मिळावेत.

यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे. त्या प्रयत्नांतून या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी शक्य होईल, त्या अनुषंगाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे, असे प्रा. डॉ. देशपांडे यांनी सांगितले.

नोंदणीसाठी - https://forms.gle/pQTbKEG2JWs9SUuB6

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT