pune sakal
पुणे

Pune : संगणक आणि मानवी मेंदूतील संवादाचे नवे पर्व सुरू होणार

हा ‘न्युरालिंक’च्यादृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. ‘न्युरालिंक’ने या परवानगीचे स्वागत केले असून थेट मानवी सहभाग असलेल्या प्रयोगांना सुरूवात करण्याबाबत उत्साही आणि समाधानी आहोत असे कंपनीकडून सांगण्यात आले.

सकाळ डिजिटल टीम

सॅनफ्रान्सिस्को - जागतिक कीर्तीचे आघाडीचे टेक्नोक्रॅट एलॉन मस्क यांच्या ‘न्युरालिंक’ या ब्रेन चिप स्टार्टअपने एक महत्त्वाचा टप्पा पार करताना मानवी मेंदू आणि संगणकातील संवादाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे.या ब्रेन मशिन इंटरफेस कंपनीला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून (एफडीए) प्रयोगशाळेतील मानवावरील चाचण्यांसाठी परवानगी दिली आहे.

हा ‘न्युरालिंक’च्यादृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. ‘न्युरालिंक’ने या परवानगीचे स्वागत केले असून थेट मानवी सहभाग असलेल्या प्रयोगांना सुरूवात करण्याबाबत उत्साही आणि समाधानी आहोत असे कंपनीकडून सांगण्यात आले. ‘न्युरालिंक’ने या परवानगीबाबतचे ट्विट केल्यानंतर ते मस्क यांनी ते शेअर केले.

मध्यंतरी मस्क यांनीच ‘न्युरालिंक’ने तयार केलेले डिव्हाईस मेंदूमध्ये बसविल्यानंतर व्यक्तीला आपल्या मनाचा वापर करून संगणकाशी संवाद साधता येऊ शकेल, असे म्हटले होते. मध्यंतरी याच कंपनीने या डिव्हाईसच्या माकडांवर घेतलेल्या चाचण्यांतून सकारात्मक निष्कर्ष हाती लागले होते.

या प्राण्यांना न्युरालिंक इंटरफेसच्या माध्यमातून व्हिडिओ गेम खेळणे शक्य झाले होते तसेच कर्सरची हालचाल देखील करता आली होती. या तंत्रज्ञानाची व्याप्ती आणि क्षमता खूप मोठी असल्याने त्यामुळे मानवाला गेलेली त्याची ऐकण्याची आणि पाहण्याची क्षमता देखील परत मिळवता येऊ शकेल असे मानले जाते. मस्क यांना हे तंत्रज्ञान

वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती शक्य

न्युरालिंकच्या चिपमुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठी क्रांती होईल असे बोलले जाते. कंपनीने तयार केलेल्या मायक्रोचिपच्या माध्यमातून अर्धांगवायू आणि अंधत्व आलेल्या रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतील.

तसेच काही दिव्यांगांना संगणक आणि मोबाईल तंत्रज्ञान वापरताना त्याचा लाभ होऊ शकतो. या चिपच्या माकडांवर घेण्यात आलेल्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. मेंदूकडून येणाऱ्या संदेश लहरींची विश्लेषण करण्याची क्षमता या चिपमध्ये असून ब्लूटूथच्या माध्यमातून ही माहिती डिव्हाईसकडे पाठविली जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT