पुणे

विज्ञान शिक्षक आहात? तर मग हे वाचाच!

सकाळवृत्तसेवा

पुणे : 'तुम्ही विज्ञान शिक्षक आहात का!', मग जरा इकडे लक्ष द्या. मुलांना अधिकाधिक चांगल्या प्रकारे विज्ञान शिकविता यावे, त्यातील अद्यायावत ज्ञान आत्मसात करून ते शिकविताना वापरले जावे, यासाठी आता राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वतीने (एनसीईआरटी) खुद्द शिक्षकांनासाठी पदविका अभ्यासक्रमाची आखणी केली आहे. त्या अनुषंगाने एनसीईआरटीेतर्फे विज्ञान शिक्षकांसाठी 'टीचिंग फॉर सायन्स ऍट अप्पर प्रायमरी स्टेज' हा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. विशेषत: इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी हा अभ्यासक्रम आहे.

संपूर्णपणे ऑनलाईन असणारा हा अभ्यासक्रम  शिक्षकांची व्यावसायिक विकास घडविण्यासाठी उपायुक्त ठरणार आहे. देशातील शाळांमध्ये सहावी ते आठवीच्या वर्गाना शिकविणाऱ्या विज्ञान शिक्षकांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे.
प्रवेश घेतल्यानंतर शिक्षकांना लॉगिन आयडी आणि पासवर्ड दिला जाणार असून, त्याद्वारे त्यांना अभ्यासक्रमाचे धडे घेता येतील. अभ्यासक्रमात ४० मॉड्यूल्स असून प्रत्येक मॉड्यूल्स आठ ते दहा तासात शिकता येणार आहे. कोर्स सुरु झाल्यानंतर प्रत्येक सोमवारी नवीन मॉड्यूल शिकविण्यास सुरवात होईल आणि आठवड्याच्या शेवटी ते मॉड्यूल शिकवून पूर्ण होईल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रत्येक मॉड्यूल शिकवून झाल्यानंतर बहुपर्यायी प्रश्न असणारी चाचणी घेण्यात येणार आहे. अभ्यासक्रमातील ४० मॉड्यूल्स शिकताना घेण्यात येणाऱ्या ४० चाचणी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना अंतिम परीक्षेला बसण्याची संधी दिली जाणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अभ्याक्रमासाठी २६ जुलैपर्यंत प्रवेश घेता येणार असून याबाबत अधिक माहिती एनसीईआरटीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम २७ जुलैपासून सूरू होणार असून ४० आठवडे म्हणजेच ३१ मे २०२१ पर्यंत त्याचा कालावधी आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर संबंधित शिक्षकांना एनसीईआरटीच्या वतीने पदविका प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ‘ऑपरेशन टायगर’ची भीती? उद्धव ठाकरेंची खासदारांसोबत तातडीची बैठक; पक्षातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

Aadhaar App Preload : "ही जबरदस्ती कशासाठी?" नवीन मोबाईलमध्ये आधार ॲप सक्तीचे; पण ॲपल-सॅमसंगचा सरकारला विरोध का? जाणून घ्या

Shalarth ID Scam : शिक्षण क्षेत्रात खळबळ! ३ लाख शिक्षकांच्या शालार्थ आयडीची एसआयटी चौकशी सुरू

Kamakhya Temple Controversy : नाशिकमध्ये 55 कोटींचं साम्राज्य! कोण आहे हा 'बडे बाबा'? ज्याच्या कामाख्या मंदिरावर 'अंनिस'ने ओढले ताशेरे; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

नाना पाटेकरांनी स्वत:च्या हाताने अभिनेत्रीसाठी बनवलं जेवण, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'माझ्यासाठी त्यांनी...' Viral Video

SCROLL FOR NEXT